‘शरद पवार इन्स्पायर फेलोशीप’ गुणवंतांना प्रदान

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशीप’ प्रदान सोहळा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी उपस्थित होते. ह्या फेलोशिप बद्दल सांगताना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, “शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या दैदीप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ च्या वतीने गेल्या वर्षी या फेलोशीप’ची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिपची सुरुवात करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याला समप्रमाणात फेलोशिप मिळावी म्हणूनच ह्या फेलोशिपचा सर्व कारभार पारदर्शक पद्घतीने चालतो. लिंगभेद केला जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक गुणवंताला इथे समान संधी मिळू शकते. ही फेलोशिप मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं अगदी पहिल्या दिवसापासून सर्व डॉक्युमेंटेशन होत आहे. त्यामुळे भविष्यातल्या फेलोंसाठी एक आदर्श वस्तूपाठ उभा राहिल.” त्या पुढे म्हणाल्या, हा एक द्विमार्गी प्रवास आहे. ह्युमन पॉवर इज ग्रेटेस्ट पॉवर आणि ह्या शक्तीचा योग्यप्रकारे वापर केल्यास महाराष्ट्र देशाचं प्रतिनिधीत्व करणारं पहिलं राज्य बनेल यात शंका नाही. पूर्वी मुली शेतकरी वरपक्षाचं स्थळ नाकारायच्या पण आता परिस्थिती बदलली आहे. आजचा शेतकरी हा व्यावसायिक झाला आहे आणि हीच महाराष्ट्राच्या विकासाची “शरद पवार इन्स्पायर फेलोशीप” च्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू झालेली नांदी आहे. फेलोशिपसाठी निवड झालेल्या सर्व फेलोंचे त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले.

‘शरद पवार इन्स्पायर फेलोशीप’ प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षपदी विराजमान असेलेले ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी म्हणाले, अनेक वर्ष शरद पवार यांच्यासोबत काम केल्यानंतर ते ठामपणाने सांगू शकतात ‘शरद पवार इज अ पॉलिटिशीान विथ डिफरन्स.’ ते पुढे म्हणाले, प्रत्येक खासदाराने अशा प्रकारची एक फेलोशिप आपआपल्या क्षेत्रात सुरू केल्यास संपूर्ण देशात अमूलाग्र बदल घडू शकेल आणि आपला देश जगाची महासत्ता बनेल. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथील शरद पवार इन्स्परेशन फेलोशिप कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला, “एका वेगळ्या आणि चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण याठिकाणी एकत्रित आलो. यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने अनेक कार्यक्रम घेतले जातात. वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. हे करत असताना जीवनाच्या काही महत्वाच्या क्षेत्रात काही आगळवेगळं काम करण्याची इच्छा ज्या नव्या पिढीमध्ये आहे त्यांना हुडकून प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम हा आखला पाहिजे असे सुप्रिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवले. त्यामधून या फेलोशिपचा जन्म झाला. बाहेर फिरत असताना आम्ही पाहतो की अनेक क्षेत्रामध्ये साधीसाधी माणसं काही चमत्कार करत असतात. या सर्व फेलोशिपमध्ये शेती, शिक्षण, आरोग्य, साहित्य अशा विशेष दोन-तीन विषयावर लक्ष केंद्रीत केलं आहे. देशाच्या कृषी मंत्रालयाची शपथ घेऊन आल्यावर माझ्यासमोर सर्वात प्रथम फाईल ही धान्य आयात करण्यासाठी आली. तेव्हा मनामध्ये एक निर्धार पक्का केला की काही वाटेल ते झालं तरी देशातील हे चित्र बदलायचे. गहू, तांदूळ, दूध, भाजीपाला, फळ या सर्व क्षेत्रात काही ना काही केल पाहिजे. हे कोण करू शकतं तर शेतकरी वर्गातील नवी पिढी. या कामामध्ये मला डॉ. मायींची मला मदत झाली. त्यांनी देशामधील प्रत्येक कृषी संशोधन केंद्रात उत्कृष्ट लोकांची भरती केली. त्या काळात शेतकऱ्याला प्रोत्साहित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले पण शेतकऱ्यांनी देखील कर्तृत्व दाखवले. आज तुमचा सन्मान होतो मात्र कितीतरी असे शेतकरी आहेत ज्यांना शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. तरी देखील ते यशस्वी झाले. आज काही क्षेत्रात आपण अजूनही मागे आहोत. खाद्यतेलाच्या बाबतीत आपण अजूनही मागे आहोत. अक्षरश: हजारो कोटी रुपयाचे खाद्यतेल आपण आयात करतो. यासाठी देशातील काही घटकाने मोहरीच्या माध्यमातून खाद्यतेलाचे उत्पादन वाढवू शकतो असे संशोधन केले आहे. त्याला परवानगी दिली तर मला खात्री आहे की या देशाची खाद्यतेलाची गरज भागेल. असे काम करणारे अनेक लोक आहेत. ते शेती, साहित्य, शिक्षणाच्या क्षेत्रात आहेत. प्रोत्साहन दिले, काम करण्याची व कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली तर लोक जीवनामध्ये यशस्वी होतात. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम केले त्याबद्दल तुम्हाला सन्मानित करण्यात आले. माझी आग्रही सूचना व विनंती आहे की हे काम तुम्ही थांबवू नका. सतत नवीन करण्याची कल्पना डोक्यात ठेवा. अपयश आले तरी त्यावर मात करण्याची हिंमत ठेवा यातून तुम्ही यशस्वी व्हाल ही माझी खात्री आहे. हा देश अनेक क्षेत्रात पुढे गेला आहे. त्याचे कारण सामुहिक शहाणपणाची प्रवृत्ती समाजातील नव्या पिढीमध्ये आहे त्याचे हे परिणाम आहेत. ही फेलोशिप संकल्पना राबवून या माध्यमातून काही चांगले कर्तृत्ववान नव्या पिढीतील घटक पुढे येतील याची मला पूर्ण खात्री आहे. सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन.”

शरद पवार इन्स्पायर फेलोशीप अंतर्गत कृषी (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर), साहित्य (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर) आणि शिक्षण (शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन) या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाते. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर मध्ये शिवानी संजय गाढवे, ओंकार दादासाहेब सस्ते, शुभम लक्ष्मण भोसले, दिपाली विठ्ठल काळभोर, रुतुजा सतीश पिसाळ, सुजितकुमार नामदेव सोनवणे, भास्कर अंकुश शितोळे, आरती राजाराम ढेंगे, वैष्णवी उमेश तोडकर, पवन नथुराम पाटील, सुदर्शन दादासाहेब गाट, प्रांजली दिलीपराव पाटील, अनुपमा चंद्रकांत पाटील, प्रतापसिंह मोहन चव्हाण, अतुल आनंदा शिंत्रे, धनश्री प्रकाश खटके, प्रसाद संजय रणखांबे, शुभम बाबुशा याहवंत, गायत्री चिंतामण धोंडेकर, शुभम बालाजी तळेकर, मयुरी शशिकांत म्हात्रे, ऐश्वर्या अरुण विचारे, ओंकार दिलीप खानविलकर, सिद्धी नारायण गावडे, साईराज दीपक पावसकर, तेजश्विनी दत्तात्रय कुमावत, विश्वजीत नवनाथ काळे, जाधव अक्षता तुकाराम, सुग्रीव तुकाराम शिंदे,

सागर अशोक गोरमाळी, विजया रामराव पवार, सचिन नामदेव वायचळ, कोमल गोविंदराव कुटे, पांडुरंग विश्वनाथ जगताप, अपेक्षा बाबासाहेब ठोंबरे, शेख उवैस शब्बीरसाब, अलका लक्ष्मणराव पाटील, कार्तिक केशवराव जाधव, राजेश्वरी सुधाकर भेंडेगावे, पूजा महादेव लिमकर, आनंद दशरथ हिवरे, कल्पना हनुमंतराव देशमुख, प्रसाद श्रीधरराव गंगाखेडकर, राजेश नंदकिशोर उदावंत, दिप्ती भास्कर शेळके, रुतुजा बापू कुरुमकर, आदित्य सुधीर जोंधळे, रुषिकेश गोरख काळे, जान्हवी दिलीप कोठमिरे, रुचा राजाराम खैरनार, ज्ञानेश कैलास देसले, हर्षल विनायक सानप, चेतन गुलाबराव पवार, आरती ईश्वर पानपाटील, टीना प्रकाश वाणी, जयेश नितीन जाधव, केतकी विजय अंधारे, भूषण विनायक खवळे, मुग्धा श्याम पिंजरकर , रुषिकेश मुरलीधर भुसारी, जान्हवी गजानन डोसे, दिपाली रामकिसन जाधव , समर्थ विवेक तुपकर, कोमल विवेक मस्के, अंकित प्रभाकर तेतर, समिक्षा रामेश्वर चव्हाण, सुतीक्ष्ण गोपाळ धोटे , नेहा चंदू भेंडारकर, हर्षल रमेश तिडाके, स्नेहल दिवाकर येरमलवार, वैभव देवानंद सातपुते, शारदा मोरेश्वर दुर्गे, प्रफुल्ल गोपाळ गव्हारे, रोशनी उमेश घरडे, प्रतीक अनिरुद्ध साखरे, अंजली पुरुषोत्तम शर्मा, सौरभ हरिचंद्र निंबार्ते, करिष्मा सिद्धार्थ मुनेश्वर, निखिल रमेश यादव आणि हरेश रवींद्र राणे ह्या ८० जणांची निवड झाली आहे.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर मध्ये विनय दिलीप खंडागळे, चिन्मय मिलिंद देव, प्रियांका अर्जुन तुपे, प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी, आशिष विश्वनाथ शिंदे, रश्मी रवींद्र राऊत , अक्षय श्रीरंग शिंपी, अमृता अमोल देशपांडे, ज्ञानेश्वर प्रकाश जाधव, रेश्मा महामद तांबोळी, प्रतिक भामरे आणि सुशांत उदावंत ह्या १२ जणांची निवड झाली आहे.शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन मध्ये राहुल खासेराव धुमाळ, समाधान वसंत शिकेतोड, मृणाल नंदकिशोर गांजाळे , बाबु चांगदेव मोरे, विनीत बंडू पद्मावार, नामदेव छबू वाजे, शंकर देवराव लेकुळे, बालाजी बाबुराव जाधव, महादेव प्रकाश मंडले, अण्णासाहेब अशोक घोडके, अरुण अशोकराव बैस, भरत विठ्ठल पाटील, प्रविण भीमराव, डॉ. नागनाथ अप्पासाहेब येवले, भाऊसाहेब संभाजी राणे, अमोल रघुनाथ घोडके, किरण दत्तू गायकवाड, पेंटू विठ्ठल मैसनवाड, उधव साहेबराव पवार आणि सचिन कुंडलिक देसाई आदीची निवड झाली आहे.

या फेलोशिपला दुसऱ्या वर्षीही भरघोस प्रतिसाद मिळाला. चव्हाण सेंटरच्या निवड समितीने २०२२-२०२३ या दुसऱ्या बॅचसाठी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८०, ‘शरद पवार साहित्य फेलोशिप’ साठी १२ व ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन’ साठी ४० अशा एकूण १३२ फेलोंची निवड केली आहे. या सर्वांना शरद पवार यांच्या हस्ते फेलोशिप सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, राजेंद्र पवार, प्रा निलेश नलावडे व सह्याद्री फार्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे सहकार्य मिळत आहे. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत. याप्रसंगी शरद पवार इन्स्पायर फेलोशीपच्या पहिल्या तुकडीतल्या शिवेंद्र भोसले, आदिती गवळी, तोश्ना साखरे, आशुतोष मोरे, असिम चाफळकर, प्रदीप कोकरे, अतुल सवाखंडे आणि वर्षा गायकवाड यांनी फेलोशिप बद्दलचे आपले अनुभव अगदी नेमक्या शब्दांत सभागृहात मांडले. ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे समयोचित सूत्रसंचालन पहिल्या तुकडीतली फेलो साक्षी मेंगाणे हीने अगदी समर्पक आणि समर्थपणे केले. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, चव्हाण सेंटरच्या सीईओ दीप्ती नाखले, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीईओ प्रोफेसर निलेश नलावडे, प्रा. नितीन रिंढे, दत्ता बाळसराफ, संतोष मेकाले, योगेश कुदळे, अनिल पाझारे तीनही फेलोशिपच्या सल्लागार समितीचे सदस्य, निवड समितीचे सदस्य, पहिल्या व दुसऱ्या वर्षीचे फेलोज् व त्यांचे कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते.

टीम झुंजार