‘पिल्लू’ विहिरीत पडलं…कुडकुडत होतं…आईपासून दुरावलं; ताटातूट झालेल्या मायलेकाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

Spread the love

नाशिक : आईची आणि लेकराची ताटातुट जर झाली असेल तर त्या आईला किती वेदना होत असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. मनुष्य प्राणी तरी याबाबत आपल्या वेदना दुसऱ्याकडे व्यक्त होऊ शकतो. मुक्या प्राण्यांचं काय होत असेल? असा प्रश्न जरी पडला तरी जीव कासावीस होऊन जातो. तेव्हा माउलीच्या जीवाचे काय होत असेल याची कल्पना केली तरी डोळ्याच्या कडा पाण्यानं भरून येतात. अशीच एका माय-लेकाची ताटातुट झाली होती. बिबट मादी आणि तिचं पिल्लू नाशिकच्या सय्यद पिंपरी परिसरात फिरत होतं. शेतकरी दीपक ढीकले यांच्या शेतात त्यांचा वावर होता. त्यातच विहिरीजवळून जातांना ते दोन महिन्यांचे असलेले बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले होते. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ वणविभागापर्यन्त माहिती पोहचवली. वनविभागाने रेस्क्यू टीमसह सय्यद पिंपरी येथे जात रेस्क्यूचे काम सुरू केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन महिन्यांच्या बिबट्याच्या पिलाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

पिल्लू बऱ्याच वेळ पाण्यात राहिल्यानं कुडकुडलं होतं, त्यात नाशिकमध्ये असलेल्या थंडी, आणि त्याचा असलेला जीव पाहता उपस्थित नागरिकही हळहळ व्यक्त करत होते.

वनविभागाने दोन महिन्यांचे असलेले पिल्लू लक्षात घेता, मादी बिबट इथेच जवळपास असण्याचा अंदाज बांधला, आणि बिबट मादी आणि टीच्या पिल्लाची भेट घडवून आणण्याचे ठरविले.

पहा व्हिडिओ :

https://twitter.com/kirantajne/status/1602867942487572482?t=n7f3hjdsi1jJQAfLLXQATQ&s=19

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिल्लाला ऊब देत गारठ्यापासून मुक्त केले होते. जवळच खड्डा करून, त्यावर सुरक्षित ठेवण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान आईची आणि पिल्लाची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होत. त्यांनतर काही वेळातच मादी बिबट तेथे आली, व्यवस्था करून फक्त चाळीस मिनिटे झाली होती. त्यात मादी बिबट म्हणजेच पिल्लाची आई तिथे आली आणि पिल्लाला घेऊन गेली. हे संपूर्ण हृदयस्पर्शी दृश्य वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. वनविभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार