मुंबई : – ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलीय. जळगाव जिल्ह्यातील देखील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे. आज जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या दोनचार दिवसांपासून जे वातावरण आहे. त्यावरुन हिवाळा आहे की पावसाळा असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू झालाय.
राज्यात हिंगोली, पालघर, बुलढाण्यासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
तर पुढील काही तासात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळेरब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






