“स्वामी” च्या नेत्रतपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ‘स्वामी’ ही संस्था समाजातील गरीब गरजू लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असते . त्यापैकी एक उपक्रम म्हणजे “नेत्रतपासणी शिबिर”. “स्वामी” ज्येष्ठ नागरिक केंद्र, परळ यांनी बुधवार दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत संस्थेच्या कार्यालयात “डोळे तपासणी शिबिर व चष्मे वाटप” उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केला होता. रोटरी क्लब ऑफ मुंबई, सायन आणि मुलुंड व्ह्यू यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम सुनियोजितपणे पार पडला. एकशे पंचवीस ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला. त्यांची नेत्र तपासणी करून तेथेच नंबरप्रमाणे त्यांना चष्मे वाटप करण्यात आले.

“स्वामी” संस्थेतर्फे त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. शिबिरार्थींनी सर्व कार्यकर्त्यांच्या अविश्रांत मेहनतीचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. परळ तसेच नजिकच्या विभागातील गोरगरीब जनतेचा उदंड प्रतिसाद आणि “स्वामी” च्या सुयोग्य नियोजनबद्ध शिस्तीमुळे शिबिर वेळेत संपन्न झाले. यावेळी समाजातील मान्यवर प्रतिष्ठित समाजसेवकांनीही सदिच्छा भेट दिली. तसेच “स्वामी” च्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

सदर उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी मोहन कटारे, उल्हास हरमळकर, किरण करलकर, विष्णू मणियार, नितीन तांबे, हरीश्चंद्र तोंडोलेकर, अनिल तावडे, प्रतिभा सावंत, विमल माळोदे, साध्वी डोके, रचना खुळे, वैशाली ढोलम, रश्मी नाईक, गीता नाडकर्णी, सुमंगल गुरव, सिध्दी परब, कुसुम सिंग, सुरिंदर कौर यांनी परिश्रम घेतले.

हे पण वाचा

टीम झुंजार