मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लालबागमधील ‘अविघ्न पार्क’ इमारतीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आली आहे. इमारतीच्या २२ व्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीनंतर इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आलं होतं. याआधीही ऑक्टोबर २०२१ मध्ये ‘अविघ्न पार्क’ इमारतीमध्ये आग लागली होती.
सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास लालबागमधील अविघ्न पार्क इमारतीमध्ये आग लागली. इमारतीच्या २२ व्या मजल्यावर लागलेल्या आगीनंतर धुराचे लोट पसरले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं.
पहा व्हिडिओ :
ऑक्टोबर २०२१ मध्येही लागली होती आग
गतवर्षीही अविघ्न इमारत आग लागल्यामुळे चर्चेत आली होती. १९ व्या मजल्यावर लागलेली ही आग विझवताना अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. या आगीत इमारतीच्या सुरक्षारक्षाकाने जीव गमावला होता. या आगीनंतर टोलेजंग इमारतींमधील सुरक्षा यंत्रणेसंबंधी प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वर्षभरानंतर पुन्हा त्याच इमारतीत आग लागली असल्याने त्यावेळी दिलेली आश्वासनं आणि सुरक्षेचे नियम अद्यापही जैसे थेच आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.