एरंडोल- येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयातील चार विद्यार्थी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध विषयांमध्ये यश प्राप्त करून गुणवत्ता यादीत आले.संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील,प्राचार्य एन.ए.पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून महाविद्यालयाने मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
महाविद्यालयातील विजय कैलास गायकवाड याने softvear डेव्हलपमेंट या विषयात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला.तसेच पंकज गजानन शिंपी हा त्रितीय वर्ष कलामध्ये अर्थशास्त्र विषयात तृतीय आला.सुचिता विवेकानंद विंचूरकर बी.कॉम.या शाखेतून तृतीय आली तर हर्षाली रवींद्र अमृतकर यांनी एम.कॉममध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील,प्रभारी प्राचार्य एन.ए.पाटील,उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर यांनी चारही विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






