जिवंतपणी कोण कसं काय फोटो लावतो गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

Spread the love

  • अध्यक्षपदाची निवड होताच गिरीश महाजनांसमोर दूध संघातील एकनाथ खडसेंचा फोटो हटवला

  • आम्ही मंत्री असलो म्हणून आमचे फोटो आम्ही लावत नाही

  • मंदाकिनी खडसे अध्यक्षा होत्या म्हणून त्यांना वाटलं असेल फोटो लावावा मात्र आम्हाला त्या फोटोची गरज नाही – गिरीश महाजन

जळगाव :- जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने एकनाथ खडसे खडसेंची सत्ता संपुष्टात आणत विजय मिळवला व या विजयानंतर आज चेअरमन पदाची निवड करण्यात आली यात आमदार मंगेश चव्हाण यांची मंत्री गिरीश महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत चेअरमन पदी निवड करण्यात आली मात्र या निवडीनंतर दूध संघातील चेअरमन केबिनमध्ये असलेला एकनाथ खडसे यांचा फोटो हटवण्यात आला. गिरीश महाजनांसमोर हा फोटो हटवण्यात आला असून आम्ही मंत्री असलो तरी आमचे फोटो आम्ही लावत नाही मात्र जिवंतपणी कोण कसं काय फोटो लावतो असा टोला यावेळेस गिरीश महाजनांनी खडसेंना लगावला आहे .


तर मंदाकिनी खडसे या अध्यक्षा होत्या त्यामुळे त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी फोटो लावला असेल मात्र आम्हाला त्या फोटोची आता गरज नाही असा उपहासात्मक निशाणा गिरीश महाजनांनी खडसेंवर साधला आहे.

एकनाथ खडसेंचा फोटोची गरज नाही – मंत्री गिरीष महाजन

आज भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची दूध संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, चेअरमन पदाचा पदभार स्वीकारताच जिल्हा दूध संघातील एकनाथ खडसे यांचा फोटो काढण्यात आला आहे. त्यामुळं तब्बल सात वर्षापासून एकनाथ खडसे यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा दूध संघात सत्तानंतर झाले आहे.

दूध संघावर भाजप-शिंदे गटाची सत्ता…

जळगाव जिल्हा दूध संघावर भाजप-शिंदे गटाची सत्ता आली आहे. जिल्हा दूध संघात अध्यक्षांच्या दालनात असलेल्या फोटोवरून मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. जिवंतपणी कसं काय कोणी कोणाचा फोटो लावू शकतो. प्रोटोकॉलनुसार महापुरुषांचे फोटो, मुख्यमंत्र्यांचा फोटो आपण या ठिकाणी लावू शकतो. मात्र एकनाथ खडसे यांचा फोटो या ठिकाणी कसा काय? असा सवालही महाजन यांनी उपस्थित केला. त्यामुळं संचालकांनी सांगितल्यानुसार खडसेंचा फोटो काढण्यात आला आहे. या फोटोची आम्हाला आता काही गरज भासत नाही असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार