श्रीरामपूरला ओमिक्रोनचा रुग्ण आढळल्याने राहाता तालुक्यात नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याची गरज–तहसीलदार कुंदन हिरे यांचे आवाहन.

Spread the love

शिर्डी (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्यामध्ये
ओमियक्रोनचा शिरकाव झाला असून श्रीरामपूर येथील 41 वर्षीय महिला ओमियक्रान बाधित निघाली आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर लगत राहता तालुक्यातील अनेक गावे आहेत या गावातील नागरिकांनी यापुढे मोठी दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच नाताळ सुट्ट्या व थर्टीफर्स्ट मुळे शिर्डीत मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता असून नागरिकांनी कोरोना च्या अटी व शर्ती पाळाव्यात .असे आवाहान राहाताचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
यासंदर्भात राहाताचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यात एक महिला ओमियक्रोन बाधित निघाली आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्याशेजारी व राहाता तालुक्यात असणारे चितळी, वाकडी, धनगरवाडी, आदींसह परिसरातील गावातील नागरिकांनी मोठी काळजी घेणे गरजेचे आहे .त्याप्रमाणे 25 डिसेंबर नाताळ सण उद्या असून हा सण मोठ्या प्रमाणात तालुक्यात साजरा होत आहे. त्याप्रमाणे नाताळ सुट्ट्या ,थर्टी फर्स्ट या निमित्ताने शिर्डीलाही मोठी साईभक्तांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून येथे विमानाने येणारे साईभक्तांची संख्या मोठी आहे. रेल्वेने साईभक्त मोठ्या संख्येने येत असतात. तसेच विविध खाजगी वाहनातून शिर्डीला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राहता तालुक्यात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासंदर्भात प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे . शिर्डी येथील सर्व रेस्टॉरंट, लॉजिंग यामध्ये तसेच इतर ठिकाणी कोणी व्यक्ती आजारी किंवा कोरोणा ची लक्षणे दिसून आल्यास त्वरित आरोग्य विभाग किंवा शासकीय कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा .कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .त्यामुळे अधिक दक्षता पाळावी ,मास्क वापरावा, सुरक्षित व सामाजिक अंतर ठेवावे, विनाकारण बाहेर फिरू नये, गर्दी करू नये ,कोरोणा संदर्भातल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करावे कोरोणा प्रतिबंधक लसीचे दोन डोस घ्यावे, जिल्ह्यामध्ये
ओमिक्रोनचा श्रीरामपूरला रुग्ण सापडल्यामुळे राहता तालुक्यातील नागरिकांनी या पुढे मोठी दक्षता घेणे गरजेचे असून सर्व शासकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचारी ,सर्व खात्यातील कर्मचारी ,अधिकारी तसेच नागरिकांनी अधिक दक्षता बाळगावी, तालुक्यातीलआरोग्य विभाग व सर्व दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी यासंदर्भात सज्ज राहावे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन
राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे. तसेच कोरोना च्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही कुंदन हिरे यांनी दिला आहे.

टीम झुंजार