Wooden Churner Oil : खाद्यतेलाला खूप मोठा इतिहास आहे. चीन आणि जपान येथे इसवी सन पूर्व 2000 वर्षांपूर्वी खाद्यतेल वापरायला सुरुवात झाली. सुरुवातीला भुईमुग आणि सूर्यफुलाच्या बिया भाजून कुटून त्या उकळत्या पाण्यात टाकून त्यापासून पहिल्या वहिल्या तेलाची निर्मिती झाली. त्यानंतर पाम,नारळ यापासूनही तेल काढले जाऊ लागले.
आधुनिक यंत्राद्वारे जेव्हा तेलनिर्मिती प्रकिया केली जाते तेव्हा त्यामध्ये अनेक रसायने जसे फॉस्पेरिक ऍसिड, कॉस्टिक सोडा, हायड्रोजन वापरली जातात जेणे करून तेल अधिक चमकदार, पारदर्शक आणि पातळ व्हावे. एकप्रकारे तेलाचे ब्लिचिंग केले जाते त्यामुळे तेल अधिकाधिक स्वच्छ दिसू लागते. परंतु हीच रसायने आपल्या शरीराला हानिकारक ठरतात. हे तेल तयार करतांना हल्ली खूपच फसवेगिरी केली जात आहे. तेलाच्या रिफायनरी मध्ये टँकर भरून कच्चे तेल आणले जाते, हे कच्चे तेल म्हणजे सर्व प्रकारच्या खाण्या योग्य आणि अयोग्य अश्या तेलबियांचे अशुद्ध असे तेल असते. त्याच तेलावर प्रक्रिया करून हवे ते फ्लेवर्स मिसळून वेगवेगळे तेल बनवले जाते.
मग त्यापुढे तेलक्रांती झाल्याप्रमाणे सर्वच तेलबियांपासून तेल काढण्याची चढाओढ सुरु झाली . जशी जशी औद्योगिक क्रांती होत गेली तसतसे निरनिराळ्या तंत्राद्यानाचा वापर करून तेलाचे उत्पादन घेतले जाऊ लागले. सद्यस्थितीत खाद्यतेलाबरोबर कॉलेस्टोल सारख्या संज्ञा जोडल्या जाऊ लागल्या. आमच्याच कंपनीचे तेल सर्वोत्तम कसे हे दाखवण्यासाठी चढाओढ सुरु झाली. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती आणि आधुनिक जीवनशैली यामुळे तेल आपल्या आरोग्यास घातक कसे याचाही पर्यायाने शोध लागला. मग हेल्थी ओईल, हृदयासाठी वेगळे तेल, मधुमेहींसाठी वेगेळे तेल असे नाना प्रकारचे तेल बाजारात येऊ लागले.
लाकडी घाण्यावर तेल काढतांना अगदी नगण्य अशी उष्णता निर्माण होते. त्यामुळे तेलातील नैसर्गिक तत्व जपले जातात. जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असे तेल मिळू शकेल. त्याचबरोबर लाकडी घाण्यावरील तेल हे स्वच्छ तेलबि वापरून काढले जाते.

आता बघू या लाकडी घाण्यावरचे तेल खाण्याचे फायदे. :
शुद्ध तेलाचा वास येतो कारण त्या तेलात 4 ते 5 प्रकारची प्रोटीन्स असतात, तो प्रोटीन्सचाच गंध असतो. शुद्ध तेलाचा चिकटपणा खुप असतो. कारण त्यामध्ये आपल्याला आवश्यक असणारे फॅटी अॅसिड असते, व्हिटॉमिन ई व मिनिरल्स सुद्धा असतात.लाकडी घाण्यावरचे तेलच खाण्यासाठी सर्वोत्तम आहे. कारण तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही शिवाय हा घाणा 1 मिनिटात फक्त 14 वेळाच फिरतो (म्हणजे या घाण्याचा आर पी एम. 14 आहे.)
त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना तेलातील एकही नैसर्गिक घटक कमी होत नाही.आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हाय डेन्सिटी लीपोप्रोटीन (एच डी एल) हा आपला लिव्हर मध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ले तरच तयार होतो, म्हणुन शुद्ध तेल खावे.शुद्ध तेल खाल्याने शरीराला वात हा दोष संतुलित राहतो व त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाहीत. कॅन्सर, किडनीचे आजार, डायबेटीस, सांधेदुखी, पॅरलिसिस, ब्रेन डॅमेज सारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.भारतात शेकडो वर्षापासुन लाकडी घाण्यावरचे तेल खातात,त्यामुळे 100 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते..लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान 40 अंश पेक्षा जास्त होत नाही त्यामुळे त्यातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही.
आपल्याला ते सर्व घटक मिळतात की ज्या घटकांची गरज आपल्या शरीराला असते.एका व्यक्तीने एका महिन्यात किती तेल खावे?आहातज्ज्ञांच्या मते, एका व्यक्तीने एका महिन्यात अर्धा लीटर तेलच वापरले पाहिजे. अशा रितीने चार माणसांच्या कुटुंबाला महिन्यातून फक्त दोन लीटरच तेल वापरले पाहिजे. योग्य रितीने नियोजन केले तर आपले आरोग्य टिकवणे आपल्याच हाती आहे. अन्यथा जास्त तेल खाणे शरीरासाठी घातक ठरू शकते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






