एरंडोल येथे राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा.

Spread the love


प्रतिनिधी । एरंडोल

एरंडोल- आज दि. 25/01/2022 रोजी 16 एरंडोल विधानसभा मतदार संघाचे मुख्यालय एरंडोल तहसिल
कार्यालय येथे तहसिलदार एरंडोल यांचे दालनात मतदार दिवसांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदि विनय गोसावी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांनी भूषवले त्यांनी तसेच सुचिता चव्हाण सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल यांनी दिप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.


यावेळी मतदारांसाठी प्रतिज्ञा घेतली व मतदार जागृतीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश आत्माराम पाटील सर जवखेडे तसेच प्रकाश भास्कर आढळकर आर. टी. काबरे एरंडोल यांनी केले. सदर कार्यक्रमात जिल्हास्तरावर उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम केलेले नुरूद्दिन ऐनोद्दीन मतदान केंद्र क्र. 180 कासोदा तसेच 16 एरंडोल विधानसभा मतदार संघात उत्कृष्ट काम केलेले मतदार केंद्रस्तरीय अधिकारी विजया प्रशांत येवले, मतदान केंद्र क्र. 73 वरखेडी 2. शेख अशफाक शेख तसब्बर मतदान केंद्र क्र. 19 पिंपळकोटे प्र.चा. 3. मुस्ताक अहमद शेख अमीर मतदान केंद्र क्र. 52 एरंडोल, 4 पांडुरंग जगन्नाथ चौधरी मतदान केंद्र क्र. 171 बांभारी खु, 5.ओमप्रकाश शिवाजी जळकोटे मतदान केंद्र क्र. 252 उत्राण यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट रांगोळी काढणाऱ्या निकिता पाटील या विद्यार्थिनीसोबत प्रांताधिकारी विनय गोसावी तहसीलदार सुचिता चव्हाण


यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी बी एल ओ,मतदार प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व नवमतदार व रांगोळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या विध्यार्थीनी स्वागत व अभिनंदन केले.दि. 24 जोनवारी 2022 रोजी मतदार दिवसाच्या कार्यक्रमानिमीत्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सदर स्पर्धेत एकूण 13 स्पर्धकांनी भाग घेतला होता, त्यापैकी 1. निकीता गजानन पाटील प्रथम 2. वैष्णवी सोपान आंधळे व्दोतीय व 3. मोहिनी प्रेमराज राठोडब 4. आकांशा राजेश पाटील यांना विभागुन तृतीय स्थानाचे आणि 5. नंदनवार होस चतुर्थ क्रमांकवर उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले. तसेच इतर सहभागी यांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले. त्याच वेळी महसुल सहायक मनोहर नामदेव राजिद्रे, संगणक चालक व एरंडोल तालुक्याचे मतदार जनजागृती व प्रचारक मधुकर जुलाल ठाकुर कासोदा व कॉलेज ऍम्बेसिटर कुमार दिपक शांताराम महाजन व कुमार ज्ञानेश्वर कैलास सपकाळे यांचा देखील प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच, नव मतदार यांना मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले.

सदर राष्ट्रीय मतदार दिवसाच्या पावन पर्वास निवडणुक शाखेचे नायब तहसिलदार राजेंद्र आहिरे,निवासी नायब तहसिलदार एस.पी. शिरसाठ, आदी मान्यवर उपस्थित होते.

टीम झुंजार