संत गाडगे महाराजांचे विचार विद्यार्थ्यांनी कृतीत आणणे गरजेचे-डॉ एस डी चौधरी.

Spread the love

निंभोरा बु.येथे संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी.

प्रतिनिधी निंभोरा बु.
परमानंद शेलोडे.

रावेर :- संत गाडगेमहाराज हे स्वच्छतेचे जनक म्हणून भारताला परिचित असून रूढी परंपरा यांना फाटा देऊन विज्ञानवादी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराजांचे विचार कृतीत असल्याचे मत डॉ.एस.डी. चौधरी यांनी पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.येथील कृषीतंत्र विद्यालयात संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषितंत्रज्ञान विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे हे होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. डी. चौधरी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,पत्रकार राजीव बोरसे व सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान सूर्यवंशी यांनी ही संत गाडगे महाराज यांच्या जीवनाबद्दल व कार्याबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांचे प्रबोधन व मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक विवेक बोंडे सर यांनी तर आभार प्रदर्शन संदीप महाजन यांनी केले.

कार्यक्रमास कृषी विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकवृंद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक बोंडे,संदीप महाजन,जितेंद्र भावसार,धनराज बावस्कर, जितेंद्र कोळंबे यांनी परिश्रम घेतले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार