प्रहार दिव्याग क्रांती संघटनेतर्फे तहसीलदार यांना दिले निवेदन
प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- तालुक्यातील बनावट अपंग सर्टिफिकेट जोडूनशासनाच्या विविध योजनांचालाभ घेणाऱ्यांची चौकशी करूनत्यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी या आशयाचे निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे तहसीलदार सुचिता चव्हाण यांना देण्यात आले.प्रहार दिव्याग क्रांती आंदोलन जळगाव यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की एरंडोल तालुक्यातील काही गावात बनावट अपंगांचे सर्टिफिकेट बनवून त्याद्वारे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ काही लोक घेत असून तसेच यातील काही शेतकरी सन्मान योजेनचाही लाभ घेताना दिसत आहे. एकाच वेळी दोन दोन योजेनेचा लाभ घेता येतो का ? कृपया याविषयी माहिती मिळावी.
तरी आपण अपंग दाखल्या द्वारे या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींची अपंगांचे सर्टिफिकेट ची पडताळणी करून बोगस लाभार्थी यांना वगळून त्यांच्या खात्यावर आतापर्यंत शासनाने जमा केलेली सर्व रक्कम वसूल करून त्यांचे अनुदान तात्काळ थांबवून खऱ्या अपंग लाभार्थीना न्याय मिळवून द्यावा.असे योगेश लोटन चौधरी प्रहार दिव्याग क्रांती जिल्हा उपाध्यक्ष, जळगाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे