एरंडोल नगरपालिकेच्या वतीने स्मार्ट गृहिणी स्पर्धेचे आयोजन, सोडतीमधून पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी

Spread the love

एरंडोल :- शहरातील ओला व सुका कचरा याचे संकलन वाढावे तसेच वर्गीकृत कचरा घंटागाडीतच टाकला जावा यासाठी एरंडोल नगरपरिषदेने अतिशय नाविन्यपूर्ण अशी संकल्पना सुरू केली असून त्याचे नाव
स्मार्ट गृहिणी स्पर्धा असे आहे.
यासाठी आपल्याला फक्त सलग 30 दिवस घंटागाडी मध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकायचा आहे. यानंतर घंटागाडीवाला आपल्याला दररोज एक कुपन देईल. असे सलग 30 दिवस 30 कुपन जमा करून नंतर ते नगरपरिषदेत जमा करायचे आहेत. प्रत्येक प्रभागातून लकी ड्रॉ द्वारे विजेते निवडण्यात येतील. व विजेत्यांना पारितोषिक म्हणून सुंदर,आकर्षक अशी पैठणी दिली जाईल.

या अनोख्या स्पर्धेला शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून दिवसेंदिवस स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. यामध्ये पहिल्या दिवशी 683, दुसऱ्या दिवशी 934, तिसऱ्या दिवशी 1139 आणि चौथ्या दिवशी 1286 नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला आहे. तरी पुढील महिनाभर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असाच वाढत राहील यात शंका नाही.

स्पर्धेचा कालावधी 20 डिसेंबर 2022 ते 20 जानेवारी 2023 असा असून जास्तीत जास्त महिलांनी/ नागरिकांनी सहभाग घेऊन पैठणी जिंकावी असे आवाहन मुख्याधिकारी श्री विकास नवाळे यांनी केले आहे.
या स्पर्धेमुळे शहरात ओला व सुका अश्या वर्गीकृत कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच या नावीन्यपूर्ण संकल्पनेमुळे नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा विषयी जागृती निर्माण होत आहे. तसेच नागरिक इतरत्र कुठेही कचरा न फेकता फक्त घंटागाडीतच कचरा टाकत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार