हिरव्यागार बोरांचे आनंद मेळाव्यात ब्रँडिंग; जरंडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

Spread the love

सोयगाव,दि.२४.जिल्हा परिषदेच्या बाल आनंद मेळाव्यात सोयगाव परिसरातील हिरव्यागार बोरांचे ब्रँडिंग करून बहरलेल्या बोरांना बाहेर मार्केटिंग केल्याचा प्रकार शनिवारी जरंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शनिवारी तालुका स्तरीय बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये शाळेतील चिमुकल्यानी विविध खाद्य पदार्थांची विक्री करण्यासाठी आणली या बाल आनंद मेळाव्यात सोयगाव परिसरातील हिरव्यागार बोरांचे विद्यार्थ्यांनी ब्रँडिंग करून विक्रीसाठी आणले होते

त्यामुळे सोयगावच्या जंगलातील हिरवी बोरे या आनंद मेळाव्यात आकर्षक ठरली होती दरम्यान या तालुका स्तरीय बाल आनंद मेळाव्याचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईदास पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले या बाल आनंद मेळाव्यात ४५ विविध खाद्यपदार्थ चे स्टोल विक्रीसाठी उभारण्यात आली होती
जरंडी च्या बाल आनंद मेळाव्यात ग्रामस्थांनी खाद्य पदार्थांची खरेदी करून चिमुकल्याच्या हातांनी बनविलेल्या पदार्थांचे आस्वाद घेतला

यावेळी धनराज हुडेकर समितीचे सदस्य अनिल पाटील,शेख शफिक कडूबा डोलारे, शेख रफिक राजू वाघ आदींनी भेटी दिल्या यावेळी शाळेच्या मुख्यध्यापक बाळासाहेब सुळ,. लक्ष्मण शेकोकार,. व्ही. व्ही. वालदे,शिल्पा चौधरी , एच. बी. मेश्राम , व्ही. एस. काटकर ,बी. पी. जांभूळकर ,. वाय. सी. शेख पुढाकार घेतला होता.

हे पण वाचा

टीम झुंजार