बुलढाणा : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच धावत्या दुचाकीवर बाळाला दूध पाजणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. दुचाकीवरुन जाताना लहान मुलाला दूध पाजताना खाली पडल्याने डोक्याला मार लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील कोलरीनजीक घडली.दुचाकीने प्रवास करताना विशेष काळजी घेण्याची गरज नेहमीच व्यक्त केली जाते. खासकरुन जेव्हा आपल्यासोबत चिमुकलं बाळ असतं, तेव्हा अधिक सजग राहण्याची गरज असते. दुचाकीवरुन लहानग्यांसह प्रवास करताना कोणती काळजी घ्यायला हवी, हे अनेक वेळा आपल्याला सांगितलं जातं.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक अपघातांच्या घडलेल्या गोष्टी ऐकून आपण थक्क होतो. मात्र घटना घडून गेल्यावर खूप उशीर झाल्याचं लक्षात येतं. असंच काहीसं बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात झालं आहे. एका लहानशा हलगर्जीमुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
बाईकने प्रवास करताना बाळाला दूध पाजणे आईच्या जीवावर बेतलं आहे. दुचाकीवरुन जात असताना लहान मुलाला दूध पाजत असताना खाली पडून डोक्याला मार लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोलरीनजीक घडली.अकोला येथील देशमुख दाम्पत्य लहान मुलीला घेऊन खामगाव येथे आले होते. दरम्यान काल रात्री ते दुचाकीने अकोलाकडे निघाले होते. यावेळी शितल आबाराव देशमुख या धावत्या दुचाकीवर आपल्या २ वर्षांच्या मुलीला दूध पाजत होत्या.
अचानक खड्डयात दुचाकी आदळल्याने शितल देशमुख या लहान मुलीसह रोडवर पडल्या. यात डोक्याला जबर मार लागल्याने शितल देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर चिमुकली रियांशी ही बालबाल बचावली. मात्र तिला तोंडाला मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी नोंद केली आहे.
चिमुकली बालंबाल बचावली
- चिमुकलीसह अकोला येथील देशमुख दामप्त्य अकोला येथे खामगावहून परत होते. दरम्यान, कोलोरी जवळ दोन वर्षांच्या रियांशी नामक चिमुकलीला दूध पाजताना तिची आई शीतल चिमुकलीसह रोडवर पडली. यात गंभीर दुखापत झाल्याने शीतल देशमुख यांचा मृत्यू झाला. तर चिमुकली रियांशी बालंबाल बचावली. तिच्यावर खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






