पारोळा :- आदिवासी बांधवांसाठी शासनाने शासन आपल्या दारी या माध्यमातून जात प्रमाणपत्र वाटपाचा उपक्रम हाती घेतला असून लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन एरंडोल प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे. रत्नापिंप्री तालुका पारोळा येथे आदिवासी बांधवांच्या जातीचे दाखले वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, मंडलाधिकारी वैशाली जाधव,सरपंच सुनीता पाटील, उपसरपंच अंकुश भागवत , ज्ञानेश्वर पाटील, तलाठी रवींद्र दिवठानणे, पोलीस पाटील प्रभाकर पाटील, कोतवाल समाधान भागवत माजी उपसभापती कैलास बोरसे, निंबा पाटील, आर एफ पाटील ,जीवन भिल, रमेश पाटील, प्रल्हाद पाटील, संदीप भिल, सुनील वानखेडे, मनोज पाटील, आदिवासी टायगर सेना, ए.टी.एस संघटनेचे सर्व पदाधिकारी यावल प्रकल्प अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्राचा खटाटोप कमी होण्यासाठी तसेच दलालांकडुन होणारी लूट थांबवण्यासाठी शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
प्रत्येकाला जातीचे अत्यावश्यक असल्यामुळे तसेच शैक्षणिक लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सतत कार्यरत असून शासन आपल्या दारी या उपक्रमातून तब्बल 80 गरजू लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली.
यावेळी दबापिंप्री येथील एकलव्य सेनेचे फलकाचे पूजन करण्यात आले. दरम्यान परिसरातील आदिवासी बांधवांचे अजून काही जातीचे दाखले राहिले असतील त्यांनी योग्य तो कागदपत्रांचा पाठपुरावा करून जातीचे
प्रमाणपत्र काढून घ्यावे. असे आव्हान याप्रसंगी करण्यात आले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






