पाचोरा : – सध्या महाराष्ट्रात चैन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सिंधी कॉलनी भागातील ६६ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सव्वालाख रुपये किमतीची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी धूमस्टाइल लांबवली. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सिंधी कॉलनीतील कमला वरलानी या परिसरात इव्हिनिंग वॉक करत असताना २५ ते ३० वयाचे दोन जण दुचाकीने मागून आले व त्यांनी गळ्यातील सतरा ग्रॅम सोन्याची चैन व त्यातील सात ग्रॅमचे पेंडल अशी सव्वालाख रुपये किमतीची मंगलपोत लांबवून धूम ठोकली.श्रीमती वरलानी यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम