धरणगाव :- दि. 24 डिसेंबर 2022 उपकेंद्र पिंप्री खु येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगांव व तालुका वैद्यकीय अधिकारी धरणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी कार्यक्रमा अंतर्गत
आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य विभागा मार्फत राबवल्या जाणाऱ्या
विविध सुविधा व योजना जनसामान्य व्यक्तींपर्यंत
पोहोचाव्या या मुख्य उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सदर शिबिरामध्ये जनसामान्यांना आरोग्य संदर्भात राबविल्या जाणाऱ्या शासनाच्या विविध योजनान संदर्भात माहिती मार्गदर्शन तसेच योग्य निदान व
मोफत उपचार सुविधा देण्यात आल्या. सदर शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद
उपकेंद्र पिंपरी खु ग्रामीण रुग्णालय धरणगाव क्षयरोग विभाग, आयसीटीसी विभाग, कुष्ठरोग विभाग, राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम, धरणगाव
महा लॅब जळगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर शिबिराला पिम्प्री खु, भोद, कल्याने, हिंगोने,
चींचपुरा येथील ग्रामस्थांचा भरपूर प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय
अधिकारी डॉक्टर संदीप पाटील यांचे मोलाचे

• मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रम यशस्वी
होण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मयूर
हिवरकर, डॉ. दीपक ठाकूर, डॉ. करण पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. जयवंत पाटील, डॉ.
निलेश जगताप, ता. आ. कार्यालयाच्या बी एन ओ
श्रीमती साळुंखे सिस्टर, श्री. निलेश पवार, समुपदेशक श्री ज्ञानेश्वर शिंपी, श्री. गणेश कुंभार,
प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. राजेश्वर काकडे, क्षयरोग पर्यवेक्षक श्री. नंदू चौधरी, कुष्ठरोग पर्यवेक्षक श्री
तुषार खंडारे, आरोग्य सेविका आय. डी. भोई, आशा लोखंडे, संगीता बावस्कर, अर्चना गोसावी, आरोग्य सहाय्यक श्री. सुधीर चौधरी श्री. विजय वानखेडे,
श्री सोमा ठाकरे महा लॅब टेक्निशियन अतुल पाटील पवन मोरे किशोर पाटील या सर्वांच्या
सहकार्य लाभले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






