सोयगाव, दि.२७..अवघ्या दहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या संरक्षण भिंतीला तडे गेल्याचा प्रकार मंगळवारी जरंडीत उघडकीस आला आहे दरम्यान या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी गेटही बसविण्यात आलेले नव्हते तरीही पाण्याचा साठाचं नसतांनाही कोल्हापूरी बंधाऱ्याच्या भिंतीला तडे गेले आहे यावरून या बंधाऱ्याचे बोगस काम झाल्याचे स्पष्ट झाले आहे
जरंडी-माळेगाव(पिंप्री) रस्त्यालगत दहा महिन्यांपूर्वी लाखो रु खर्चून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला या बंधाऱ्यात पाणी साठवण झालेले नसतांनाही या बंधाऱ्याच्या संरक्षण भिंतीला तडे गेले असून बंधाऱ्यात कोल्हापुरी गेट बसविण्यात आलेले नसूनही या बंधाऱ्याच्या उभारणी चे कोल्हापुरी गेट सह संबंधित ठेकेदारांनी देयके उचलून घेतले आहे दरम्यान लाखो रु निधी खर्चून या बंधाऱ्यात पाणी साठवून परिसरातील १५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते परंतु संबंधित ठेकेदारांनी या बंधाऱ्यात पाणीच अडवू दिले नसून या बंधाऱ्याच्या गेट ची देयकेही उचलून घेतली आहे दरम्यान दहाच महिन्यात या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या संरक्षण भिंतीला तडे गेले असून या बंधाऱ्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे या कामाची गुणवत्ता तपासणी न करताच संबंधित विभागाने देयके काढून दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे
-ठेकेदारावर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार
जरंडी शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम बोगस झालेले आहे या बंधाऱ्यात कोल्हापुरो दरवाजे न बसविताच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कोल्हापुरी दरवाज्यासह या ठेकेदार ला देयके अदा केली आहे त्यामुळे या गैरकारभाराची चौकशी न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे शेतकरी उत्तम गवले यांनी इशारा दिला आहे….








