मागण्या मान्य न झाल्यास २६ जानेवारी पासून आमरण उपोषणाचा इशारा
कोल्हापूर ( हिंदूसम्राट प्रतिनिधी ): लोकसेवा महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने कोविडमुळे निधन झालेल्या व्यक्तींची कर्जमाफी व्हावी यासह विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात महावीर गार्डन येथून झाली. कोविडमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शैक्षणिक फी मध्ये सवलत मिळाली पाहिजे, महिलांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व लोकसेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कागले, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख नम्रता सुतार यांनी केले.
देशभरात कोविड महामारीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली. काही लोक मरणाच्या दारातून परत आले. काही लोकांना मुलगा, बहिण, भाऊ, नवरा, आई, वडील असे नातेवाईक बघायला सुद्धा मिळाले नाहीत. अशी भिषण परिस्थिती निर्माण झाली होती. दगावलेल्या कुटुंबातील प्रमुख समस्या सुटल्या नाहीत. आणि अनेक घरे उध्वस्त झाली . आर्थिक अडचणीत अनेक कुटुंब सापडली. उपासमारीचे दिवस व हालाखीचे जीवन भोगावे लागले . त्यातून राहतं घर बँकेला तारण दिल्यामुळे त्यांना बँकेकडून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
बँकेने तगादा लावल्यामुळे राहत्या घरापासून बेघर होण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. बँकेकडून नोटीस घर जप्तीचे आदेश त्यांना देण्यात आले.या परिस्थितीमुळे बँकेचे हप्ते भरणे त्यांना कठीण जाऊ लागले व त्या महिलांना हप्ता भरणे शक्यच नाही. कर्ता पुरुष दगावल्यामुळे उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली. त्यांना आत्महत्या करण्याशिवाय काहीच उपाय राहिलेला नाही. म्हणून कोविडमध्ये दगावलेल्या कुटुंबाची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. शेती कर्ज, गृह कर्ज क्रेडिट कार्ड कर्ज संपूर्ण माफी मिळालीच पाहिजे . कोविडमध्ये दगावलेल्या महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा त्यांना रोजगार मिळण्यासाठी कोर्सेस अथवा ट्रेनिंग द्यावे व त्या महिलांना सक्षम बनवावे, ज्या महिलांचे अपुरे शिक्षण असेल त्यांना मोफत शिक्षण द्यावे, त्यांच्या मुलांना फी मध्ये सवलत द्यावी, शासकीय निम शासकीय संस्थांनी प्रशासकीय योजनेची माहिती एकत्र करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी,
कोविड महामारी दगावलेल्या कुटुंबातील महिलांसाठी नवीन योजना निर्माण करण्यात यावी, इ. मागण्यांची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. या मागण्या मान्य न झाल्यास 26 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व लोकसेवा महासंघाचे संस्थापक राज्याध्यक्ष उत्तमराव कागले यासह महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख नम्रता सुतार, कावेरी मोटणावर, राणीताई खुडे, जितेंद्र शिंदे, महेश कांजर, शोभा साळुंखे, सोनाली कोपा, अर्चना कांबळे, धीरज निकम, अविनाश कांबळे, श्रीधर निळकंठ, अजित पाटील,वर्षा गवस, अनिता देशमुख, अश्विनी कांबळे, धीरज निकम, प्रमोद जंगम, स्वामिनी कदम, शुभांगी साळवी, विद्या साळुंखे, वैशाली झांजगे, वंदना घडलिंग, कल्पना चव्हाण, वैष्णवी लकडे आदी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






