औरंगाबाद: – सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अनेकदा नदी किंवा तलावातील कचरा अडकल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण, एका मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क साप अडकले. एक-दोन नव्हे तर तब्बल 20 साप. माश्यांऐवजी साप पाहून मच्छीमाराची भंबेरी उडाली. यावेळी सर्पमित्र्याच्या मदतीने सापांची सुटका करण्यात आली.
ही घटना मंगळवारी विटावा शिवारातील तलावात घडली. मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात एक नव्हे तर वीस साप अडकले. साप पाहून मासेमारी करणाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर सर्पमित्रांना बोलवावे लागले. 20 पैकी 14 सापांचा जीव वाचविण्यात त्यांना यश आले, तर 6 सापांचा मृत्यू झाला.
पहा व्हिडिओ :
जिवंत सापांना सुखरूप निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. विटावा गावात नदीमध्ये मासेमारी करणाऱ्या लोकांनी जाळे टाकले होते, त्यात जाळ्यामध्ये दिवड नावाचे साप अडकले. बालाजी बोईनवाड या स्थानिक नागरिकांच्या कॉलवरून मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी मंगळवारी सर्पमित्र मनोज गायकवाड, लक्ष्मण गायके यांना घटनास्थळी पाठविले आणि सापांची सुटका केली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






