पत्नीचे अनैतिक संबंध होते…प्रियकर आणि पत्नी दोघे मिळून असं काही करायचे की पतीने थेट जीवनच संपवलं, पोलीस तपासात आली धक्कादायक बाब

Spread the love


नाशिक : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात मंगळवारी राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी यांची बेपत्ता झाल्याची त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यामध्ये पोलीसांनी गुन्हा नोंद करून घेतली होती. मात्र दोन दिवस उलटल्यावर गंगापूर पोलीसांना बापू पुलाजवळ एक मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला होता, त्याची चौकशी केली असता राकेश यांचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी राकेश यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. त्यावेळी गंगापूर पोलीसांनी तपासात काही आढळून आल्यास गुन्हा दाखल करू अशी माहिती नातेवाईकांना दिली होती.

त्यानुसार गंगापूर पोलीसांनी याबाबत तपास करत असतांना धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रियकर आणि स्वतः पत्नी पतीला मानसिक त्रास देत असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने पती मानसिक तणावात गेला होता. पत्नी आणि तीचा प्रियकर त्रास देत असल्याने पती पती राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव बैरागी या 34 वर्षीय आत्महत्या केली आहे.
यावरून गंगापूर पोलीसांनी केलेल्या तपासाच्या अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याने पत्नी आणि प्रियकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी यांचा मृतदेह बापू पुलानजीक तरंगताना बोटिंगला आलेले अंबादास तांबे यांनी बघितला होता. त्यानंतर त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळवली होती. अंबड पोलिस ठाण्यात राकेश यांची तीस वर्षीय पत्नी आणि तिचा प्रियकर रिझवान मन्सुरी यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोघांच्या अनैतिक संबंधामुळे मानसिक तणावात पती राकेश आला होता, त्यामुळे त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलीस आता पुढील तपास करीत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार