नाशिकः नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी घटना घडली आहे. नाशिकमधील इगतपुरी गावापाशी असलेल्या जिंदाल कंपनीत भीषण असा स्फोट झाला आहे. यामुळे कंपनीला मोठी आग लागली.या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झालेले आहेत. ही आग कंपनीतील बॉयलरमुळे लागल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळला असून बॉयलरमुळे आग लागण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
राज्याचे बाष्पके संचालक धवल प्रकाश अंतापूरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिंदाल पॉलीफिल्म लि. इगतपुरी या कंपनीत एकूण ५ बॉयलर्स आहेत त्यापैकी ३ हे वेस्ट हीट रिकव्हरी वा थेरमिक फ्लुइडने चालणारे आहेत. म्हणजेच या बॉयलर्समध्ये वाफ तयार करण्यासाठी ज्वलनशील इंधन लागत नाही .उर्वरित २ बॉयलर्स हे स्मॉल इंडस्ट्रियल बॉयलर्स प्रकारातील आहेत म्हणजेच छोटे बॉयलर्स आहेत . म्हणूनच बॉयलरमुळे आग लागण्याची शक्यता कमी आहे . उपसंचालक बाष्पके हे घटनास्थळी प्रत्यक्ष तपासणीअंती याबाबत स्पष्ट माहिती देणार आहेत.
इगतपुरी मुंढे या गावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत सकाळी 10-11 च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा खुप मोठा आवाज झाला. पॉलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या जिंदाल ग्रुपच्या या कंपनीत स्फोट झाला. या आगीमध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या आगीचे लोळ वर वर येत होते.ही आग 1-2 किमी अंतरावरून वरून सुध्दा दिसच होती. ही घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. विषेश बाब म्हणजे ही आग ज्या ठिकाणी लागली आहे. त्या ठिकाणवरून 150 मीटर अंतरावर मोठा डिझेल टँक आहे. त्या टॅंकमध्ये सुमारे 20 हजार लिटर पेक्षा जास्त डिझेल होते.सुदैवाने आग आटोक्यात आली त्यामुळे मोठी हानी टळली
मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट :
जिंदाल कंपनीत भीषण आगीत जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात भेट घेतली. या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचाराचा खर्च शासन करणार आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच या घटनेची चौकशीचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.






