सोयगाव, दि.०१..(साईदास पवार).. गेल्या पंधरा दिवसापासून रात्री थंडी अन दिवसा कडाक्याचे ऊन आशा दुहेरी वातावरणामुळे रब्बी पिकांची वाढ गोत्यात आली आहे या बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका मका पिकांना बसला असून मक्याची वाढ खुंटली आहे यामध्ये रब्बी चा कालावधी निघून जात आहे
सोयगाव तालुक्यात आधीच खरिपाच्या पिकांचा लांबलेल्या काढणीच्या हंगामामुळे रब्बी चा हंगाम लांबला होता ऑक्टोबर अखेरीस सोयगाव तालुक्यात रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या
यामध्ये मका पिकांची सर्वाधिक लागवड करण्यात आलेली असून मात्र गेल्या पंधरवड्यात सोयगाव तालुक्यात अचानक वातावरणात बदल झालेला आहे थंडी ची कमी झालेली तीव्रता आणि दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्री थंडीची अचानक वाढलेली लाट अशा दुहेरी वातावरणात रब्बीच्या मक्याची वाढ खुंटली आहे त्यातच रविवारी दिवसभर सुरू झालेल्या थंडगार वाऱ्याने रब्बीच्या पीकावर प्रादुर्भाव आढळून आला आहे रविवार (दि.०१) सोयगाव तालुक्यात अचानक वाऱ्याची लाट आली होती दिवस भर थंडगार वाऱ्याचा फटका बसला असून कोवळी पिकांची अंकुर वाकली आहे
दरम्यान पंधरवड्यापासून बदलते वातावरण आणि रविवारी अचानक सुटलेला वारा यामुळे रब्बीच्या पिकांची अवस्था खराब झाली होती दरम्यान खुंटलेल्या पिकांच्या वाढी साठी उपाय योजना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे रब्बी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे…
–कृषी विभागाचे मौन तर शेतकऱ्यांची कसरत
रब्बीच्या पिकांची वाढ खुंटली असतांना सोयगाव तालुक्यात कृषी विभागाने मौन बाळगले असून दुसरीकडे मात्र रब्बीच्या पिकांची वाढ वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे…..






