यवतमाळ :- 2 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. यातच आता यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत नवऱ्याने पत्नीला जोरदार मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. हे दोन्ही पती आणि पत्नी व्यसनाधीन होते.ही धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरातील पंचशीलनगरमध्ये घडली.
दारूच्या नशेत नवऱ्याने बायकोला केलेल्या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. यानंतर सायंकाळी महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. पत्नी आणि पत्नी दोघेही दारूच्या आहारी गेले होते आणि नशेत असताना त्यांचे भांडण झाले. यातून ही घटना घडली. वैशाली उत्तम गाडेकर (35) असे मृत महिलेचे नाव आहे.
वैशाली आणि तिचा नवरा उत्तम हे दोन्ही नवरा बायको रविवारी सकाळी दारू प्यायले. यातूनच दोघांमध्ये वाद झाला. यावेळी उत्तमने त्याची पत्नी वैशालीला काठीने, नंतर गुंडाने बेदम मारहाण केली. यात वैशालीचा गंभीर जखमी झाली. यानंतर तिचा मृत्यू झाला.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






