माध्यमिक विद्यालय अंजनविहिरे विद्यालयात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच बालिका दिन मोठ्या उत्साहाने साजरा

Spread the love

धरणगाव :- माध्यमिक विद्यालय अंजनविहिरे विद्यालयात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच बालिका दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील मुख्याध्यापक श्री एकनाथ सुकलाल पाटील हे होते.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री साबीर तडवी हे होते.


विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एकनाथ पाटील सर यांनी प्रमुख अतिथींचे शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व अतिथी तसेच माझे सहकारी बंधूंनी प्रतिमेचे दीप प्रज्वलन केले.


विद्यार्थी भाषण झाले यात आरुषी किशोर सपकाळे , यज्ञा संदीप पाटील , अश्विनी बाळू पाटील , हेमांगी गणेश पाटील, कल्याणी अनिल सपकाळे, वैष्णवी भरत चव्हाण , मानसी प्रवीण चव्हाण , मयुरी अनिल सपकाळे , राजश्री गुलाब पाटील, कविता गोरख शिरसाट , पल्लवी नरेंद्र पवार , सलोनी भाऊसाहेब चव्हाण , पूर्वा सुरेश सोनवणे, अंजली सुनील सोनवणे व गायत्री श्रीराम पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच विद्यालयातील लाडके शिक्षक श्री बाळासाहेब उत्तम चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी सखोल माहिती दिली .


तसेच विद्यालयातील उपशिक्षिका सौ.योगिता रामभाऊ पाटील मॅडम यांनी पूर्वीच्या काळातील स्त्रि कुठल्या गोष्टींना सामोरे जावे लागत असे तसेच सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाविषयी माहिती दिली.


तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक आदरणीय श्री एकनाथ पाटील सर यांनी जुन्या चालीरीती परंपरा याविषयी मार्गदर्शन केले तसेच विद्यालयातील विद्यार्थिनी आरुषी, यज्ञा, अश्विनी ,हेमांगी, व गायत्री या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी गीत गायले .
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षक श्री अनिल मनोरे सर यांनी केले तर आभार विद्यालयातील उपशिक्षक श्री राजेंद्र पाटील सर यांनी मानले????????????????

हे वाचलंत का ?

टीम झुंजार