जळगाव : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव शहरातील रायसोनी नगरातील एका तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उघड झाली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मुकेश सुभाष सोनार (वय-४०) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील रायसोनी नगरात मुकेश सोनार हा आई-वडील व मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. गेल्या काही दिवसापासून मुकेश याची पत्नी मुलासह माहेरी गेली आहे. मुकेश हा हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत होता. बुधवारी त्याची आई कल्पनाबाई सोनार आणि वडील सुभाष नारायण सोनार हे कामाच्या निमित्ताने गावात आले होते. त्यावेळी घरात मुकेश हा घरात एकटाच होता. यादरम्यान मुकेश याने दुपारी घराचा दरवाजा आतून बंद करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
आईवडील घरी परतले अन् घरी मुलाचा दिसला मृतदेह
दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्याचे आईवडील हे घरी आले. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता मुकेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आईवडीलांनी हंबरडा फोडला. घरातील लोकांनी शेजारचांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.
याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी रेवानंद साळुंखे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






