मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या २०७ धावांचा पाठलाग करताना भारताला २० षटकांत ८ बाद १९० धावांपर्यतच मजल मारता आली. अक्षरसह मुंबईकर सूर्यकुमार यादवनेसुद्धा ३६ चेंडूंत ५१ धावा काढताना भारताच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ५ बाद ५७ धावांवरून दोघांनी सहाव्या विकेटसाठी ९९ धावांची तुफानी भागीदारी रचली. परंतु सूर्यकुमार बाद झाल्याने दडपण वाढले. शिवम मावीने १५ चेंडूंत २६ धावा फटकावत अक्षरला साथ देण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या सहा चेंडूंत २१ आवश्यकता असताना कर्णधार शनकाने अक्षर आणि मावीला बाद केले आणि अवघ्या चार धावा दिल्या. अक्षर पटेलने (३१ चेंडूंत ६५ धावा) साकारलेल्या घणाघाती खेळीनंतरही श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या टी२० सामन्यात भारताला १६ धावांनी पराभव पत्करावा लागला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. कसुन रजियाने इशान किशन (२) आणि शुभमन गिल (५) यांना दुसन्याच षटकात माघारी पाठवले. घरच्या मैदानावर खेळाताना राहुल त्रिपाठीला (५) चाहत्यांची मने जिंकण्यात अपयश आले. तर कर्णधार हार्दिक १२ धावा काढून तंबूत परतला. दीपक हुडाने १२ चेंडूंत फक्त ९ धावा केल्या. १० षटकांत भारताने जेमतेम ६० धावांची मजल मारली होती. मात्र त्यानंतर सूर्यकुमार आणि अक्षर यांनी आक्रमक रूप धारण केले. अक्षरने वानंदू हसरंगाच्या एकाच षटकार तब्बल चार पटकार खेचले, तर एकवेळ २० चेंडूंत १४ धावांवर खेळणाऱ्या सूर्यकुमारने ३५ चेंडूंतच अर्धशतकाची वेस ओलांडली अक्षरने अवघ्या २० चेंडूंतच घणाघाती अर्धशतक साकारले, दुर्दैवाने या दोघांच्या प्रयत्नानंतरही भारताला पराभव पत्करावा लागला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने या लढतीसाठी संजू सॅमसनच्या जागी राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी दिली तर हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंगचा समावेश करण्यात आला. दरम्यान, श्रीलंकेचे सलामीवीर कुशल मेंडिस आणि पथुम निसांका यांनी पहिल्या चेंडूपासूनच झाले. आक्रमणावर भर दिला. विशेषतः मेडिसने तीन चौकार आणि चार षटकारांसह ३१ चेंडूंत ५२ धावा फटकावल्या. युझवेंद्र चहलने मेंडिसला पायचीत पकडून श्रीलंकेला पहिला झटका दिला. मेंडिस व निसांका यांनी ५० चेंडूंत ८० धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर उमरान मलिकने भानुका राजपक्षे २ धावावर त्रिफाळा उडवला. अक्षरने निसांकाला ३३ धावांवर बाद करून भारतासाठी तिसरा बळी मिळवला. धनंजय डीसिल्व्हा (३) छाप पाडू शकला नाही. चरिथ असलकाने चार षटकारांच्या सहाय्याने १९ चेंडूंत ३७ धावा फटकावल्या तो बाद झाल्यानंतर शनकाचे मैदानावर आगमन झाले. शनकाने भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना अवघ्या २० चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने तब्बल सहा पटकार आणि दोन चौकार लगावताना २२ चेंडूंत नाबाद ५६ धावांची खेळी साकारली. त्यामुळे एकवेळ १७५ धापर्यंत मजल मारू शकेल, असे वाटणान्या श्रीलंकेने ६ बाद २०६ धावांचा डोंगर उभारला.
भारतीय गोलंदाजांनी टाकलेल्या एकूण सात नो बॉलचाही श्रीलंकेने लाभ उचलला. अर्शदीपने एकट्यानेच पाच नो बॉल टाकले. भारताकडून मलिकने तीन, अक्षरने दोन, तर चहलने एक बळी मिळवला. श्रीलंकेचा कर्णधार आणि सामनावीर दसुन शनकाचे (२२ चेंडूंत नाबाद ५६ धावा) झंझावाती अर्धशतक आणि एका षटकात ४ धावांत २ बळी केलेल्या प्रभावी मार्याच्या बळावर श्रीलंकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या सामन्यात कसाबसा मिळवणारा भारतीय संघ आज श्रीलंकन फलंदाज आणि गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरला. शनिवारी राजकोट येथे उभय संघातील निर्णायक लढत रंगणार आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.