सोलापूर :- सोलापूर शहरात हृदयद्रावक घटना घडली आहे. नई जिंदगी परिसरातील प्रभाकर नगर येथे विजेचा करंट लागून सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. एमन बंदेनिवाज बिराजदार, असं मृत मुलीचं नाव आहे. गल्लीत रस्त्याकडेला खेळत असताना मुलीचा विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला. विजेचा खांब हा महापालिकेचा असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली मृत मुलीच्या कुटुंबियांचे शासकीय रुग्णालयात आंदोलन सुरू आहे.
काय आहे प्रकरण ?
सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातील प्रभाकर नगर येथे सात वर्षीय एमन बंदेनिवाज बिराजदार रस्त्याच्या कडेला खेळत होती. यावेळी पथ दिव्याच्या खांबाला धक्का लागल्याने विजेचा झटका बसून चिमुकलीचा मृत्यू झाला. घटनेनंतर मुलीला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यानंतर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली मृत मुलीच्या कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात आंदोलन सुरू केलं आहे. सकाळी आठपासून शासकीय रुग्णालयातील शिवविच्छेदन विभागासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.
मयत मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रहारची मागणी आहे. मागील 25 तासापासून आंदोलन सुरु असताना देखील पालिकेकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. काल संध्याकाळपासून कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. संबंधित विजेचा खांब महापालिकेचा आहे. त्यामुळे पालिकेच्या गलथान कारभारामुळेच खाबाला करंट होता. ज्यामुळे एका निष्पाप जीवाचा जीव गेला. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे. तसेच घटनेत बळी पडलेल्या मृत मुलीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






