VIDEO : “आज मैं मूड बना लिया”.. अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज, स्वतःही गाण्यावर थिरकल्या; पहा व्हिडिओ

Spread the love


सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नवीन गाण्याचं पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं होतं. आता त्यांच्या या नवीन गाण्याचं टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

नुकतंच त्यांचं “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे”” हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय.

“आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे एक पार्टी सॉंग आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा वेगळा आणि हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अमृता फडणवीस यांनी या गाण्यात डान्सही केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा वेगळा अंदाज या गाण्यातून पाहायला मिळणार आहे.

पहा व्हिडिओ :

अमृता फडणवीस या बँकर असून, सामाजिक क्षेत्रातही त्या कार्यरत आहेत. त्यांना गायनाची आवड असून, याआधीही त्यांनी अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी आपल्या या नव्या म्यूझीक व्हिडिओ साँगचं पोस्टर सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं होतं.


हे वाचलंत का ?

टीम झुंजार