जळगाव :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरात एक भिषण अपघात झाला आहे. संगीता कैलास पाटील यांचे पती कैलास पाटील आजारी असल्यामुळे जळगाव येथील चिन्मय हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. संगीता सकाळी 8.30 वाजता सासू इंदुबाई यांच्यासोबत पतीसाठी जेवणाचा डबा घेऊन निघाल्या. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेने त्यांना जोरदार धडक दिली.
जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन जाण्यासाठी घरून निघालेल्या पत्नीला गावातच काही अंतरावर रुग्णवाहिकेने धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात घडली.
संगीता कैलास पाटील (वय ४८ वर्ष, रा. कुसुंबा ता. जि. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. एकीकडे पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे पत्नीचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे संगीता कैलास पाटील या आपल्या पती कैलास लक्ष्मण पाटील, सासू इंदुबाई आणि मुलगा शुभम यांच्यासह वास्तव्याला होत्या. गेल्या 8 दिवसांपासून कैलास पाटील हे आजारी असल्यामुळे त्यांना जळगाव येथील चिन्मय हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगीताबाई पाटील ह्या आज शुक्रवार सकाळी 8.30 वाजता सासू इंदुबाई यांच्यासोबत पतीसाठी जेवणाचा डबा घेऊन जाण्यासाठी घरून निघाल्या. कुसुंबा गावातून येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिका क्रमांक (एमएच 19 सीवाय 7091) ने त्यांना जोरदार धडक दिली.
या धडकेत संगीता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. ज्या रुग्णवाहिकेने धडक दिली, त्याच रुग्णवाहिकेतून संगीता पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. या ठिकाणी तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी संगीता यांना मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डोळ्यादेखत सुनेच्या मृत्यूने सासूला बसला मोठा धक्का
संगीता यांच्यासोबत त्यांच्या सासूबाई इंदुबाई होत्या. डोळ्यादेखत सुनेचा अपघातात मृत्यू झाल्याने सासू इंदुबाई यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. एकीकडे मुलगा रुग्णालयात दाखल तर दुसरीकडे सूनबाईचा मृत्यू यामुळे इंदुबाई यांना मोठा धक्का बसला आहे. मयत संगीता पाटील यांच्या पश्चात पती, एक मुलगा शुभम, सून, सासू आणि नम्रता व तेजस्विनी अशा दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.