जळगाव (पिंप्राळा हुडको) / सतिष शिंदे
जळगाव :- शहरातील पिंप्राळा हुडको ही काबाड कष्ट करुन पोट भरणा-या असंघटित कामगारांची वस्ती…
या वस्तीत एक वस्तीचं नाव आहे दुध फेडरेशन…
या वस्तीत मा.भगवान कांबळे,मा.संजय कदम व मा.सम्राट तायडे यांनी बौध्दपौर्णिमेला हा कार्यक्रम आयोजित केला.हे तीन्ही मान्यवर बामसेफच्या असंघटित क्षेत्रातील कामगार विंगचे पदाधिकारी…
राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघाच्या मा.प्रा.मिनाक्षीताई वाघमारे ह्या जळगाव जिल्ह्याचे बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष आयु.प्रा.डॉ.प्रकाश कांबळे यांच्या सुविद्य अर्धांगिनी…..
“मी सावित्री बोलतेय” हा एकपात्री नाट्यप्रयोग अत्यंत लाजबाबपणे सादर केला.त्यांच्या अभिनय व उत्कृष्ठ प्रबोधनात्मक संवादामुळे उपस्थित महिलांच्या डोळ्यांमधुन अक्षरशः अश्रुंच्या धारा वाहु लागल्या….
*या अत्यंत प्रभावी नाट्यप्रयोगानंतर प्रा.डॉ.प्रकाश कांबळे सरांनी बौध्दपौर्णिमेचे औचित्य साधुन तथागत बुध्दांवर जे विद्वत्ताप्रचुर व्याख्यान दिल्याने उपस्थित बंधु भगिनी प्रंचंड कडाक्याची थंडी असुनही जागेवरुन रात्री ११ पर्यंत उठायला कोणी तयार नव्हते..
या प्राध्यापक असणा-या जैविक बुद्धिवादी उभयतांनी गावखेड्यात जो प्रबोधनाचा जो धडाका लावला,असाच धडाका बुध्दिवादी म्हणवल्या जाणा-या मान्यवरांनी लावला तर बहुजन महापुरुषांची विचारधारा प्रस्थापित होण्यास वेळ लागणार नाही. अशी उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.