चोपडा : – बसमध्ये प्रवासात एक तरुण मोबाईलमधील गाणे मोठ्या आवाजात वाजवत होता, त्याला गाण्यांचा आवाज हळू कर आणि व्यवस्थित टिकीट घे, असं महिला बस वाहकाने सांगितल्याचा राग आला. त्यानंतर तरुणाने महिला बस कंडक्टरसह भांडण सोडविण्यास आलेल्या बस चालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे.
ही घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील कमळगाव बस स्थानकावर बुधवारी घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन रतीक जुलाल बागुल (वय २३ वर्ष, रा. पिंप्री ता. चोपडा) या तरुणाला अडावद पोलिसांनी अटक केली आहे.
दि. ४ जानेवारी रोजी सकाळी महिला वाहक ह्या कर्तव्य बजावत होत्या. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास बस कमळगाव बस स्थानकावर आल्यावर बसमध्ये रतीक बागुल हा तरुण बसला. तो महिला वाहकाकडे बघून मोबाईलमध्ये जोर-जोराने गाणी वाजवत होता. महिला कंडक्टरने आवाज कमी कर, असे रतिकला सांगितले. तरी देखील तो महिला वाहकाकडे पाहत होता.
त्यावर बस थांबवून महिला वाहकाने तरुणाला तू व्यवस्थित तिकीट घे, मला तुझ्यापेक्षा मोठ्या वयाची मुले आहेत, असे सुनावले. याचाच राग आल्याने रतिकने महिला वाहकाला बसच्या खाली ढकलून देत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तरुण व महिला वाहकामधील भांडण सोडविण्यास आलेले बस चालक यांना देखील रतिकने चापटा बुक्यांनी मारहाण करत त्यांचा चष्मा फोडला व नुकसान सुद्धा केले.
या प्रकरणी महिला वाहकाने दिलेल्या तक्रारीवरुन रतीक बागुल याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत पाटील हे करीत आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ संशयित तरुणाला अटक केली आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






