खासदार श्री उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
भुसावळ :- रेल्वेने प्रवास करणाऱ्या खान्देशातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई सेंट्रल -दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळ पर्यंत धावणार आहे. यामूळे खान्देशवासियांनी आनंद व्यक्त केला आहे.
खान्देशातील प्रवाशांच्या समस्या लक्षात घेता भाजपा नेते तसेच तमाम खान्देशातील जनता यांच्या मागणीला प्राधान्य देत मुंबई सेंट्रल दोंडाईचा(०९०५१/५२) ही गाडी पाळधी किंवा जळगाव पर्यंत करण्यात यावी यासाठी निवेदन दिले होते.पश्चिम खान्देशच्या प्रवाशांसाठी थेट मुंबई सेंट्रल जाण्यासाठी नविन हंगामी प्रवाशी रेल्वे दि.९ जानेवारी पासुन ३१ मार्च पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असुन सदर गाडी रविवार ,मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री ११.५५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथुन सुटेल प्रवासादरम्यान बोरीवली, भोईसर, वापी ,बलसाड ,नवसारी ,चलथान ,बेस्तान , बारडोली, व्यारा, नवापुर ,नंदुरबार , दोंडाईचा या ठिकाणी थांबुन अमळनेर १०.४७ मि.धरणगांव ११.१० मि.पाळधी ११.५५ मि.जळगाव व दुपारी १२ वा.भुसावळ येथे पोहोचेल.
सदर गाडी भुसावळ येथुन सोमवार,बुधवार व शनीवारी सुटणार आहे. विशेषत: सदर गाडीला प्रचंड मागणी असलेल्या बोईसर वापी येथे थांबा देण्यात आलेला आहे . यासंदर्भात खा.डॉ.हिना गावीत,खासदार उन्मेश पाटील, पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, आ.जयकुमार रावल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व दर्शना जर्दोश ,रेल्वे बोर्ड यांच्याशी संपर्क व पत्रव्यवहार व पाठपुरावा केला.
त्या अनुषंगाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई सेंट्रल दोंडाईचा एक्सप्रेस भुसावळ पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे संपूर्ण खान्देशातील प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे.सदर गाडी 10 जाने पासून भुसावळ येथून निघून अमळनेर येथे देखील थांबणार आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४