जळगाव : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगावात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. तिने हे टोकाचं पाऊल का घेतलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. मात्र, तिच्या या निर्णयाने तिच्या आईला मोठी धक्का बसला आहे.
जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस घेत आहेत. पण, यामागील काहीही कारण अद्याप पुढे आलेलं नाही.
जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरातील ही अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. अल्पवयीन मुलीची आई जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. त्या नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेल्या होत्या. शुक्रवारी ही अल्पवीयन मुलगी घरी एकटी असताना तिने ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी सात वाजता जेव्हा आई घरी आली तेव्हा तिच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांना त्यांची मुलगी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हे दृष्य पाहताच त्यांनी मोठा आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. त्यांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक जाधव यांनी अल्पवयीन मुलीला मृत घोषित केले.
ही अल्पवयीन मुलगी जळगाव शहरातील एका महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिक्षण घेत होती. तिने आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. याबाबत डॉ. दीपक जाधव यांच्या माहितीवरुन रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.