Winter Health Tips : हे पदार्थ खाऊन तुम्हाला थंडी वाजणार नाही. याचा फायदा असा होईल की, थंडीच्या दिवसातील थंड हवेमुळे तुम्ही आजारी पडणार नाही. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे पदार्थ…..
Winter Health Tips : हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण वुलनचे कपडे वापरतात. याने शरीर गरम राहतं. त्यासोबतच असेही काही पदार्थ आहेत ज्यांचं सेवन करून तुमचं शरीर थंडीच्या दिवसात आतून गरम ठेवतात. हे पदार्थ खाऊन तुम्हाला थंडी वाजणार नाही. याचा फायदा असा होईल की, थंडीच्या दिवसातील थंड हवेमुळे तुम्ही आजारी पडणार नाही. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे पदार्थ…..
देशी तूप :
घरी कढवलेले किंवा बाहेरून आणलेले शुद्ध देशी तूप आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. अन्न तुपात शिजवावे किंवा भात, वरण, पोळीवर तूप लावून त्याचे सेवन करावे. तूप हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगल्या फॅट्सचा एक अमूल्य स्रोत आहे. हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची पातळी सुधारण्यासाठी तूप हा एक सोपा मार्ग आहे.
गाजर खावे :
हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या या निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. गाजर हेही त्यापैकीच एक आहे. एका संशोधनानुसार, ज्या लोकांनी तीन आठवड्यांसाठी दररोज सुमारे एक कप गाजर खाल्ले, त्यांच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी आढळून आली.
हिरवी मिर्ची –
तिखट हिरव्या मिर्ची खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. मिर्चीचा तिखटपणा शरीराचं तापमान वाढवतो. ज्याने आतून गरम वाटतं. त्यामुळे थंडी दूर करण्यासाठी तुम्ही हिवाळ्यात हिरव्या तिखट मिर्च खाऊ शकता.
ड्राय फ्रूट्स –
ड्राय फ्रूट्स जसे की, बदाम, खजूर, मनुके इत्याही खाऊन तुम्ही शरीर आतून गरम ठेवू शकता. यातील पोषक तत्व जसे की, व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशिअम, कॉपर, झिंक, कॅल्शिअम आणि इतरही हेल्दी प्रोटीन असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
आले –
आल्याचा गुणधर्म हा उष्ण असतो. हिवाळ्यात छोट्या छोट्या समस्या जसे की, खोकला, सर्दी-पळसा, घशात खवखव, इन्फेक्शन, ताप इत्यादी दूर करण्यासाठी तुम्ही आल्याचे सेवन करू शकता. अनेकजण या दिवसात आल्याचा चहाही सेवन करतात.
कांदा –
या दिवसात कांदाही शरीराचं तापमान वाढवतो. कांदा तुम्ही अधिक खात असा तर शरीरातून घाम घेऊ लागतो. तसेच कांद्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. त्यामुळे या दिवसात भरपूर कांदा खावा.
हळद –
हळदीचं सेवन केल्याने तुम्ही अनेक रोगांपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव करू शकता. आयुर्वेदातही हळदीला फार महत्त्व देण्यात आलं आहे. गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने तुम्हाला गरम वाटेल आणि इन्फेक्शनपासूनही तुमचा बचाव होईल.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






