VIDEO : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने ! बजाज फायनान्स कार्यालयाची तोडफोड; भीतीने कर्मचारी पळाले, पहा व्हिडिओ.

Spread the love

जळगाव : –  राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना जळगावमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. यावेळी कार्यालयातील कर्मचारी भीतीने पळून गेल्याचीही माहिती आहे.

बजाज फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या पर्सनल लोनचा एक हप्ता थकला. त्याच्या वसुलीसाठी घरी गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवले म्हणून बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्‍यांनी बजाज फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी अंमळनेर शहरात घडली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी घेतलेल्या पर्सनल लोनचा एक हफ्ता थकल्याने बजाज फायनान्सचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, पत्नी एकटी घरी असताना वसूली कर्मचार्‍यांनी दादागिरी केली. वसुलीसाठी बजाज कंपनीच्या कर्मचार्‍यांची दादागिरी बाबत अनेक शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या होत्या. यामुळे शिंदे गटाचे संतप्त पदाधिकार्‍यांनी मंगळवार १० रोजी सायंकाळी अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील बजाज फायनान्स कार्यालयाची तोडफोड केली.

पहा व्हिडिओ :

या घटनेने फायनान्स कंपनी कार्यालयातील कर्मचारी घाबरून पळून गेले. कार्यालयातील खुर्च्या, टेबल, संगणक यांची तोडफोड करण्यात आली. याबाबत शाखा व्यवस्थापक विकास सुभाष पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार