नाशिक : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच आज पहाटे सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघातात झाला आहे. या अपघातात खासगी बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात अनेकांचा जागेवरच मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज पहाटेच सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्या मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, 6 महिला तर दोन चिमुकल्याचा समावेश असल्याची पोलिसांनी माहिती दिली. या अपघातानंतर एकच आक्रोश आणि किंकाळ्या सुरू झाल्या.
प्रवाश्यांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने मदत केली.
खासगी बसमधून 35 ते 45 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर जखमींवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींवर शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. या अपघाताप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
दरम्यान, नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






