निंभोरा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतर्फे कॅलेंडर (दिनदर्शिका)चे वाटप

Spread the love

निंभोरा बु:
परमानंद शेलोडे.

निंभोरा ता.रावेर:- येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा स्टेशन यांच्या वतीने बँकेचे व्यवस्थापक राधेश्याम मुंगमोळे यांनी पत्रकार बांधवांना कॅलेंडर (दिनदर्शिका ) वाटप केले.
यावेळी निंभोरा येथील मा. पं.स. सदस्य तथा दै. महाराष्ट्र सारथीचे पत्रकार प्रमोद भाऊ कोंडे, दैनिक सकाळचे पत्रकार दस्तगीर खाटीक ,आणि ऐनपूर येथील दैनिक देशदूचे पत्रकार अनिल आसेकर , झुंझार चे पत्रकार परमानंद शेलोडे उपस्थित होते.


यावेळी बँकेचे व्यवस्थापक राधेश्याम मूंगमोळे यांनी सध्याच्या दैनंदिन जीवनात
डिजिटीलिकरण झाले असले तरी दिनदर्शिका यामुळे आपल्याला प्रत्यक्ष निरीक्षण व भिंतीवर चित्र शिल्पाद्वारे आपल्याला माहिती मिळवून देणारे साधन आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने याचा वापर करून जीवनाला एक शिस्तबद्ध व एक अगदी साधी सोपी पद्धत अवलंबली पाहिजे असे मत व्यक्त केले.शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळवून देण्यासाठी महत्व पूर्ण भूमिका, सहकार्य मुंगमोळे यांचे होते.
स्टेट बँक व्यवस्थापकांचे सर्व पत्रकार बांधवांतर्फे परमानंद शेलोडे यांनी आभार मानले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार