घराघरात जिजाऊ जन्मल्या तरच शिवबा राजे घडतील — चैताली रावतोळे
धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे
धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
शिक्षिका ग्रीष्मा पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून जिजाऊ व विवेकानंद यांच्या चरित्राचा परिचय करून दिला. यांचे चरित्र म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत असल्याची माहिती ग्रीष्मा पाटील यांनी दिली. शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला आणि शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण केली. शाखा व्यवस्थापक गावित म्हणाले की, प्रत्येक मुलाने विवेकानंदांच्या स्वच्छ चरित्राचा अंगिकार केला पाहिजे. प्राचार्या रावतोळे यांनी सांगितले की, घराघरात जिजाऊ जन्माला आल्याशिवाय शिवबा राजे घडणार नाहीत. याप्रसंगी शिक्षिका नाजुका भदाणे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे तसेच रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, प्रियंका मोरे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, सागर गायकवाड हे शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रीष्मा पाटील यांनी केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






