शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानात मापात पाप करीत असल्याचे समोर आले आहे त्यात कमी धान्य मिळत असल्याने लाभार्थी व गावकऱ्यांनी रेशन धान्य वाटप बंद पाडले असून तहसीलदार यांनी चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे
आडगाव येथील रेशन दुकानदार रावताळे यांनी गुरुवारी सकाळी धान्य वाटप करण्यासाठी सुरुवात केली असता लाभार्थ्यांना दिलेले धान्य घरी घेऊन जात असताना त्यातील एका लाभार्थ्याने घरी धान्य मोजणी केलीअसता प्रत्येक धान्य मागे किंवा दोन किलो धान्य कमी निघाल्याचे निदर्शनास आले काही ग्रामस्थांनी रेशन दुकानात जाऊन धान्य घेतले व तेथेच नवीन मोजमाप केले असता त्यात लाभार्थी युवराज जरा वाघ यांना 20 किलो तांदूळ दिले होते मात्र ते पुन्हा मोजले असता 18.800 ग्रॅम किलो कमी भरले यावरून स्वस्त धान्य दुकानदार हा मापात पाप करीत असल्याचे स्पष्ट झाले दिवान खर्डे यांनीही 16 किलो तांदूळ घेतले मुळात 14.400 किलोग्रॅम एवढेच भरले विशेषता सर्व धान्य रेशन दुकानदाराच्या वजन काट्यावर मोजण्यात आले होते याबाबत ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करीत दुकानाबाहेर एकच गर्दी केली होती रेशन दुकानदारांवर पी ओ एस मशिना मधील पावत्याही देत नसल्याने गावकऱ्यांनी सांगितले मोजुन कमी भरलेली धान्य वजन काटा गावकऱ्यांनी ताब्यात घेऊन ग्रामपंचायतीच्या ख़ोलीत जमा केला आहे व वरिष्ठ अधिकारी आल्यावर त्यांना दाखवू असा पवित्रा घेतला आहे सदर चौकशी मार्फत असे आढळून आले कि धान्य कमी प्रमाणात मिळते तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी चौकशी साठी पुरवठा विभागात चे परदेशी व सहकारी यांनी चौकशी केली असता त्यांना असे निदर्शनास आले कि रेशण धान्य वाटप बरोबर आहे पण वाटत करणारा हात सफाई करतो असे निदर्शनास आले नवीन मोजमाप केले यावेळी कमी दिड ते तिन किलो ग्रॅम कमी भरलेली आढळून आले यांच्या वर तहसीलदार व महसूल विभाग व पुरवठा विभागाचे अधिकारी काय कारवाई करतील याकडे गावकरयाचे लक्ष्य वेधले आहे