विद्यार्थ्यांनो व्यवहारीक जीवनात बाल आनंद मेळाव्याचे महत्त्व आपल्याला उत्तेजन देईल – केंद्र प्रमाख प्रमोद पाटील सर.
पिंप्री खू – प्रतिनिधी / सतिष शिंदे
पिंप्री येथील वेदमाता गायत्री बहूउद्देशिय संस्था संचलित आदर्श बालक तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा , प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडिअम स्कूल यांच्या संयुक्त नियोजनाने 14 जानेवारी , शनिवारी बाल आनंद मेळावा घेण्यात आला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून उदघाटन करण्यात आले.

प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थ कला , विविध चविष्ट पदार्थ , यांचा मनमोहक संगम जणू एकत्र आला होता. या वेळी , विद्यार्थ्यांनी खमण , पाणी पुरी ,गुलाम जाम , पोंगे बटाटे ,रगडा , मसाले पापड , बिट चे लाडू , तीळ लाडू , कचोरी ,सामोसे , ताक , असंख्य चविष्ट मेजवानी सादर केल्याने खाद्य प्रेमी विद्यार्थ्यांनी देखील चांगलाच ताव मारला. यावेळी ‘ आदर्श ‘ पदार्थांची ‘ प्रोग्रेसिव्ह ‘ चव…! असेच जणू वाटत होते . बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विक्री केले तब्बल सात हजार दोनशे रुपयांचे खाद्य पदार्थ विक्री केले.!

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंप्री येथील केंद्र शाळेचे केंद्र प्रमुख प्रमोद पाटील सर उपस्थित होते तर संस्थेचे सचिव विनोद चौधरी , संचालक प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व युनिट चे मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन एस के शिंदे तर आभार आर एस पाटील यांनी मानले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






