धरणगाव प्रतिनिधी योगेश पाटील
धरणगाव येथे मुन्नादेवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाऊंडेशन संचलित ,ज्योती देवी अन्नपूर्ण भंडार या सेवाभावी योजनेतून आज 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर खिचडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. सेवाशुल्क रुपये पाच मध्ये एक खिचडीची डिश मिळेल.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष धरणगाव चे सुपुत्र आयकर आयुक्त मा विशाल
जी मकवाने हे होते,या प्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ ,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक डी आर पाटील, काँग्रेसचे सचिव डी जी पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे धरणगाव तहसीलदार देवरे साहेब, पोलीस निरीक्षक शेळके साहेब, श्रीजी जीनीगचे नयन गुजराती ,सुरेश नाना चौधरी,माजी नगराध्यक्ष अजय शेठ पगारीया ,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन , ओबीसी सेलचे संजय महाजन ,आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते
सर्व प्रमुख अतिथींनी भाषणामध्ये जीवन आप्पा बस व त्यांच्या परिवाराने या सेवाभावी उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले
या फाउंडेशन चे सर्वेसर्वा जीवन आप्पा वेळेस यांनी आभार मानताना भावुक झाले असता म्हणाले मी गरिबीही विसरलो नाही, गरीबी काय असते,जो भुकेला असतो त्याला विचारावं अन्नाची किमंत काय असते हे मी विसरु शकत नाही,अशीच प्रेरणा मला माझी पत्नी स्वर्गीय ज्योतीदेवी बयेस नेहमी द्यायची, म्हणून आई, वडील, काकु यांच्या संस्काराचा शिदोरीतुनच आज मी सेवा भावी काम करीत आहे.
एक वर्ष पासुन या अन्न भंडारातुन ३० रु जेवण मिळते,ज्या लोकांना अपंगत्व मुळे,वयामानामुळे गरीब व गरजु लोकांना जाता येत नाही आशा लोकांना घरपोच डब्बे पोहचवण्यासाठी दररोज तजविज करीत असतात, आता ५रु खिचडी देणार आहेत,पुढचा याचा उपक्रम आहे तो म्हणजे युपीएससी व एमपीएससी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना साठी प्रशिक्षण वर्ग घेण्याचा मानस आहे.
या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन जितेंद्र बयेस यांनी तर प्रास्ताविक धिरेन्द्र पुरभे यांनी केले,कार्यक्रम यशस्वी ते साठी तेजेन्द्र चंदेल, मुकेश बयस, निखिल बयस,बाली बयस,मोहनीश चंदेल, यशपाल चंदेल, निलेश बयस,आबा वाघ ,गोरख देशमुख, राजेंद्र ठाकुर, बिपीन भाटीया यांनी सहकार्य केले.