प्रतिनिधी – संतोष कदम.
औरंगाबाद :- वंचित बहुजन आघाडीचे शेख हाशम शहानुर यांची लिंबे जळगाव ग्रामपंचायतींच्या उप सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल यांनी उप सरपंच पदांसाठी फॉर्म भरून नंतर वापस घेतला त्यामुळे शेख हाशम शहानुर हे बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले या निवडणूक प्रक्रियेत माजी सरपंच अनिस पटेल, माजी उप सरपंच सय्यद समीर पटेल यांनी सुध्दा वंचित बहुजन आघाडीचे हाशम शहानुर यांना मतदान करून सहकार्य केले
लिंबे जळगाव ग्रामपंचायतीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अकरा पैकी सहा सदस्य निवडून आले होते यांत वंचित तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, तालुका उपाध्यक्ष शेख हाशम शहानुर, वंचित महिला आघाडीच्या तालुका कार्यकारिणी सदस्य सौ सविता रुपचंद गाडेकर,आसराबाई उध्दव दाणे शेख सुमय्या इरफान, शांताबाई ज्ञानेश्वर जाधव या सहा सदस्यांचा निवडून आलेल्या मध्ये समावेश होता आज झालेल्या उप सरपंच पदांचा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे गंगापूर तालुका उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शेख हाशम शहानुर यांची सर्वानुमते उप सरपंच म्हणुन निवड झाली असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन कारभारी पाटील गोलांडे, वंचित चे तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल,माजी सरपंच काकासाहेब दाणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे, सय्यद हारून गुलाब पटेल, शेख इरफान युनुस पटेल, शेख मानामत रज्जाक पटेल, ज्ञानेश्वर जाधव, आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






