दुर्दैवी घटना!पतंग उडवीत असताना विहिरीत पडून अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू, गावावर शोककळा.

Spread the love


पिंप्री प्रतिनिधी (अरुण शिरसाठ सरपंच हिंगोणे ) धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथे राहत असलेल्या अकरा वर्षाच्या बालकाचा आज पतंग उडवतांना मांजा भिंगरीत गोळा करीत मागे चालत असताना विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी हिंगोणे खुर्द गावात कोणीही सण साजरा केला नाही.

आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. तथापि, यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथे घडली आहे. येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन (माळी ) कुटुंब उदरनिर्वाहा निमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी) हा बालक गावापासून जवळच असलेल्या माजी सरपंच गुलाब महाजन, आत्माराम महाजन यांच्या एन ए झालेल्या शेतात आज साडेअकरा वाजेपासून पतंग उडवत होता. अक्षय हा पतंगीच्या माजा भिंगरीत गोळा करीत असताना मागे चालत होता.

याप्रसंगी या शेतातील अत्यंत छोटे कठळे असलेल्या विहीरीत त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. विहीर ही 40 ते 45 फूट खोल असून त्यामध्ये वीस ते पंचवीस फूट पाणी होते. या विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे त्याच्यासोबत पतंग उळवित असलेल्या मुलांनी लागलीच आरोडारोड केल्यामुळे गावातील काही युवक घटनास्थळी आले व त्यांनी लगेच विहिरीत उतरून अक्षय याचा शोध घेऊन त्याला वर काढले व गावातीलच डॉ.चौधरी यांच्याकडे तपासण्यासाठी नेले तेथील डॉक्टरांनी अक्षय यास एरंडोल येथे घेऊन जा असे सांगितले. हिंगोणे सरपंच अरुण शिरसाट, प्रदीप महाजन, साहेबराव पाटील, विजय पाटील, मोतीलाल कुवर, आत्माराम महाजन, सुनील महाजन यांनी दुचाकी वर बसून एरंडोल येथील कल्पना हॉस्पिटल येथे दाखल केले

डॉ. स्नेहल पाटील, डॉ. राहुल पाटील यांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अक्षय या बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय माळी या बालकाचे वडील संजय महाजन हे शेती करून आपला परिवार उदारनिर्वाह करतात अक्षय हा इयत्ता हा पाचवीत शिकत होता, या बालकाच्या मृत्यूमुळे हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे. तेथील ग्रामस्थांनी आज मकर संक्रांत सण सुद्धा साजरा केला नाही. अक्षय महाजन यांच्या पश्चात आई वडील व एक बहीण असा परिवार आहे.

टीम झुंजार