जळगाव :- शहरातील गरीब,गरजू शिक्षणपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यासाठी विशेष मार्गदर्शन वर्ग चालविणे अविनाश जावळे हे आर्यन स्कूल ला मुखध्यापक असून आपल्या शिक्षण क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांचे कार्य सुरू आहे , जळगाव शहरातील गरीब वस्तीभागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मागील चार वर्षांपासून अविनाश जावळे हे स्वतः घरी निःस्वार्थ विशेष मार्गदर्शन वर्ग चालवीत असतात, या विशेष मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून अविनाश जावळे हे गरजू होतकरू विद्यार्थ्याना ज्यांना आपल्या हालाकीच्या परिस्थिती मुळे आधुनिक शिक्षण घेता येत नाही अश्या विद्यार्थ्याना आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचे काम आपल्या विशेष मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून करता आहेत .
या साठी अविनाश जावळे यांनी स्वतः च्या लग्नाचे खर्च टाळून गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्व खर्चाने कॉम्प्युटर लॅब व ई-लर्निंग क्लास रूम सुरू करून दिले , आज पर्यंत अनेक विद्यार्थी अविनाश जावळे यांच्या या विशेष मार्गदर्शन वर्गातून घडले आहेत ज्यात प्रामुख्याने अविनाश जावळे यांनी जळगाव शहराला पहिली संविधान कलम क्वीन उपलब्ध करून जी फक्त 10 वर्षांची मुलगी असून तीला संविधानातील संपूर्ण कलम तोंडी पाठ आहे याचं बरोबर गणित विषयाची भीती आपल्या शॉर्ट ट्रिक्स च्या मदतीने अविनाश जावळे यांनी विद्यार्थ्याना शिकवून मोठे व कठीण गणित गुणाकार विद्यार्थी काही सेकंदात सोडवितात , अविनाश जावळे यांच्या या शिक्षण क्षेत्रातील समाजसेवी कार्याची दखल घेऊन पुणे येथे महाराष्ट्र राज्य युवक मित्र परिवारा च्या वतीने पत्रकार भवन शासकीय सभागृह येथे आयोजित युवा संमेलनात या वर्षीचा राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार अविनाश किरण जावळे यांना पुणे जिल्ह्याचे जी.एस.टी. इन्सपेक्टर सौ.प्रेमीला जी तलवाडकर , जेष्ठ उद्योजक श्री.गोविंद जी ढाके, पुणे येथील जेष्ठ कवी नानाभाऊ माळी यां मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र युवकमित्र परिवारा चे संस्थापक प्रवीण महाजन,हेमा चव्हाण, दर्शना चव्हाण,विनायक चव्हाण,किरण जावळे, गीता जावळे,धीरज जावळे आदी उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.