निंभोरा बु।।ता रावेर (वार्ताहर)दि. :- 12 जानेवारी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती कृषि तंत्र विद्यालय निंभोरा बु|| येथे साजरी करण्यात आली.सर्व प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आले
या प्रसंगी कृषि तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे व ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे यांची उपस्थिती होती.
आपल्या भाषणात राजीव बोरसे यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे विचार विद्यार्थ्यांना पटवून सांगितले तसेच श्री प्रल्हादभाऊ यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा उजाळा करून देतांना जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.व आजच्या पिढीला या कु
ची अत्यंत गरज आहे असे प्रतिपादन केले. तसेच स्वामी विवेकानंद हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आध्यात्मिक नेत्यांपैकी एक होते. ते केवळ आध्यात्मिक मनाचे, एक विपुल विचारवंत, उत्तम वक्ते आणि उत्कट देशभक्त होते. जागतिक स्तरावर हिंदू धर्माला एक आदरणीय धर्म म्हणून स्थापित करण्यासाठी प्रयत्न केले असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले
या प्रसंगी विशाल पाटील, भावना भालेराव, आरती कोळी, नेहा गाढे, निशा इंगळे, कांचन भालेराव,इ. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास जितेंद्र भावसार , जितेंद्र कोळंबे, धनराज बावस्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्र संचालन विवेक बोंडे तर आभार संदिप महाजन यांनी केले.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






