जामनेर प्रतिनिधी अरुण तायडे
सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुका पोलीस स्टेशन ची नव्यानेच बांधकाम झालेली इमारत किती दिवसापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती आज दिनांक 26 जानेवारी रोजी नूतन इमारतीचे उद्घाटन माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन नगराध्यक्ष सौ साधना महाजन यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पोलीस ठाण्यातील बाकी राहिलेले कामासाठी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थानासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केली आहे पालक मंत्री यांनी लगेच सरकारकडे तात्काळ प्रस्ताव पाठवून पुरेसा निधी मंजूर करून आणण्याचे आश्वासन गिरीश भाऊ यांना दिले यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पाचोरा विभागिय भारत काकडे पोलीस पोलीस निरीक्षक किरण शिंदे पोलीस उपनिरीक्षक मोहिते तसेच सर्व कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते