एरंडोल-प्रसिद्ध उद्योजक तथा बालाजी उद्योग समुहाचे संचालक अनिल काबरा यांना धमकी देवून खंडणी वसूल करणा-या खंडणीखोरांविरोधात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहका-यांनी केलेली कारवाई पोलीस खात्याची प्रतिमा उंचावणारी आणि अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.खंडणीखोरांविरोधात त्वरित करून त्यांना अटक केल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार चिमणराव पाटील,बालाजी उद्योग समुहाचे संचालक अनिल काबरा,दिनेश काबरा,संजय काबरा,प्रसाद काबरा यांचेसह व्यापारी संघटनांच्या पदाधिका-यांनी पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा बालाजी उद्योग समुहाचे संचालक अनिल काबरा यांना खंडणीखोर कायम धमकी देवून खंडणीची मागणी करीत होते.खंडणीखोरांच्या त्रासाला व धमकीला कंटाळून अनिल काबरा यांनी येणा-या धमकीची माहिती पोलिसांना दिली.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी खंडणीखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य नियोजन केले.सोमवारी (ता.१६) खंडणीखोर खंडणीची रक्कम घेण्यासाठी येणार असल्यामुळे पोलिसांनी बालाजी ऑईल मिल परिसरात सापळा रचला.खंडणीखोर खंडणीची रक्कम घेण्यासाठी आले आणि खंडणी स्विकारताच मिल परिसरात वेषांतर करून दाबा धरून बसलेल्या पोलीस कर्मचा-यांनी महिलेसह तिच्या सहकारी खंडणीखोर साथीदारांना रंगेहाथ पकडले.
आपल्या सहका-यांना पोलिसांनी पकडले असल्याचे समजताच मिलच्या बाहेर थांबलेल्या अन्य खंडणीखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता,मात्र पोलीस पथकाने पाळधी पोलिसांच्या सहकार्याने सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी खंडणीखोरांचा बंदोबस्त केल्यामुळे आमदार चिमणराव पाटील,बालाजी उद्योग समूह आणि व्यापारी संघटनांच्यावतीने पोलिसांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.एरंडोल सारख्या शांतताप्रिय शहरात खंडणीसारखे प्रकार घडत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह पोलीस कर्मचा-यांनी खंडणीखोरांच्या मुसक्या आवळून त्यांचे विरुद्ध कारवाई केल्यामुळे नागरिक आणि उद्योजकांच्या मनात असलेली भीती दूर झाली असल्याचे सांगितले. कोणत्याही व्यावसायिक अथवा व्यापारी,नागरिक यांना खंडणीबाबत धमक्या आल्यास त्यांनी त्वरित पोलिसाना माहिती द्यावी असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह हवालदार अनिल पाटील,ममता तडवी,वैशाली पाटील, मिलिंद कुमावत,संतोष चौधरी,राजेश पाटील, अकिल मुजावर,जुबेर खाटिक,होमगार्ड दिनेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील,व्यापारी संघटनेचे अशोक चौधरी, जगदीश बिर्ला,नितीन बिर्ला,मयूर बिर्ला,भगवान पाटील, भास्कर ठाकूर,पवन बिर्ला,राकेश लढे,युवासेनेचे बबलू पाटील,आबा पाटील,किरण पाटील,राजेंद्र मानुधने, के.जी.पाटील,भास्कर ठाकूर,अतुल जाखेटे,पप्पू जाखेटे,गोविंद बिर्ला,मयूर महाजन यांचेसह व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.






