झुंजार प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर :- येथून जवळच असलेल्या बेटावद ता शिंदखेडा येथील रहिवासी संजय बाबूलाल भोई वय ४५ हे गेल्या २४ पासून बेपत्ता होते , त्याबाबत नरडाना पोलिसांत हरवल्याची नोंद घेण्यात आली होती , तर आज दिनांक १८ रोजी दुपारी भिलाली येथील मधुकर चैत्राम पाटील यांच्या मालकीच्या शेतात बेवारस मृतदेह तरंगताना दिसून आल्याने पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हवालदार सचिन चव्हाण ,पीएसआय विनोद पाटील यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बाहेर काढून नातेवाईकांनी ओळक पाठविली , जागीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला आहे , मयत संजय भोई यांनी गेल्या २५ तारखेला विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांना पोलिसांना दिली ,याबाबत परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






